Header Ads

Header ADS

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार, २०२३-२४ करिता अर्ज करण्याचे आवाहन दिनांक १४ जानेवारी ते २६ जानेवारी, २०२५ या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने करता येणार अर्ज

Applications for Shivchhatrapati State Sports Awards 2023-24 will be invited online from 14th January to 26th January 2025


 शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार, २०२३-२४ करिता अर्ज करण्याचे आवाहन


दिनांक १४ जानेवारी ते २६ जानेवारी, २०२५ या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने करता येणार अर्ज


 लेवाजगत न्यूज जळगाव -महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागाद्वारा राज्यातील सर्वोत्कृष्ट क्रीडापटूंना व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या व्यक्तींना क्रीडा विभागाचा प्रतिष्ठेचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येतो.

क्रीडा क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य करणा-या ज्येष्ठ क्रीडा महर्षिकरीता जीवन गौरव पुरस्कार, क्रीडामार्गदर्शकांकरिता उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक/जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार (महिला क्रीडा मार्गदर्शक), शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू), शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (साहसी उपक्रम), शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) असे पुरस्कार प्रदान करण्यात येतात.

                    सन २०२३-२४ या वर्षाच्या पुरस्कारासाठी राज्यातील क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, दिव्यांग खेळाडू व साहसी उपक्रमात सहभागी झालेले खेळाडू/व्यक्ती यांच्याद्वारा दिनांक १४ जानेवारी ते २६ जानेवारी, २०२५ या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. 

           अर्ज सादर करण्यासाठी इच्छूक क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, साहसी उपक्रम व दिव्यांग खेळाडू यांनी या मुदतीत क्रीडा विभागाच्या https://sports.maharashtra.gov.in संकेतस्थळावरील स्क्रोलिंग लिंक (Scrolling Link) मध्ये उपलब्ध करून दिलेल्या लिंकवर दिनांक १४ जानेवारी ते २६ जानेवारी २०२५ रोजी रात्री १२:०० वाजेपर्यंत फक्त ऑनलाईन अर्ज सादर करण्यात यावेत. असे आवाहन जिल्हा क्रिडा अधिकारी रविंद्र नाईक यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.