चिनावल येथे धर्मनाथ बीज निमित्ताने सामूहिक नवनाथ पारायण "हजारो भाविकांची उपस्थित"
चिनावल येथे धर्मनाथ बीज निमित्ताने सामूहिक नवनाथ पारायण "हजारो भाविकांची उपस्थित"
लेवाजगत न्यूज सावदा:- येथून जवळच असलेल्या चिनावल येथील जागृत देवस्थान नवनाथ मंदिरात प्रतिवर्षी प्रमाणे धर्मनाथ बीज निमित्त या दिवशी सामूहिक नवनाथ पारायण सोहळा आयोजित करण्यात येत असतो. यावर्षी देखील दिनांक ३१ जानेवारी २०२५ शुक्रवारी येथे धर्मनाथ बीज निमित्ताने या सामूहिक नवनाथ पारायणाचे आयोजन येथे करण्यात आले होते.
आज शुक्रवार सकाळ पासूनच येथे पारायणास सहभागी होणाऱ्या भाविकांची गर्दी झाली होती.सकाळी साडे आठ वाजे दरम्यान प्रथम श्री स्वामी समर्थ महाराज व श्री दत्तात्रय भगवान यांची आरती झाल्या नंतर संकल्प पूजन केल्या नंतर या पारायणास सुरवात झाली. या पारायणा साठी चिनावल सह सावदा, फैजपूर, रावेर, तसेच भुसावळ, जळगांव , वर्धा आदी ठिकाणाहून भाविक भक्त येथे दाखल झाले होते.
दरवर्षी प्रमाणे यावर्षीही सुमारे पाच हजार महिला,पुरुष,युवक,युवती भाविकांनी येथे या पारायणात सहभाग घेतला . यात महिला भाविकांची संख्या लक्षणीय होती.सायंकाळी पारायण पूर्ण झाल्यावर आरती व त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते, या संपूर्ण कार्यक्रम यशस्वीतेसाठी चिनावल ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत