रेल्वेतून पडल्याने अज्ञाताचा मृत्यू ओळख पटवण्यासाठी सावदा पोलीस ठाण्याशी संपर्क साधा
रेल्वेतून पडल्याने अज्ञाताचा मृत्यू ओळख पटवण्यासाठी सावदा पोलीस ठाण्याशी संपर्क साधा
लेवाजगत न्यूज सावदा:- जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील सावदा पोलीस स्टेशन येथे अकस्मात मृत्यू नं.01/2025 बी.एन.एस.एस.कलम 194 प्रमाणे दि.02.01.2025 रोजी 17.03 वाजता दाखल असुन सदर अकस्मात मृत्यू मधील अनोळखी इसम नाव गाव माहीत नाही.(वय अंदाजे 50 ते 60 ) हा दि.02/01/2025 14.00 वाजताच्या सुमारास सदर वरील वर्णनाचा एक अनोळखी पुरुष जातीचा वय अंदाजे 50 ते 60 वयोगटातील हा रेल्वे खंबा क्र.452/20-22 दुसखेडा-सावदा डाऊन रेल्वे ट्रॅकच्या बाजुला रेल्वेतुन पडुन मयत अवस्थेत मिळुन आलेला आहे.
सदर मयत हा अनोळखी असुन त्याचे वारसाचा शोध लागला नाही. तरी नमुद अज्ञात मयत याचे बाबत अगर त्याचे वारसाबाबत काहीही माहीती प्राप्त झाल्यास ती सावदा पोलिस स्टेशन येथे अगर तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक गर्जे अमोल मो. नं. 9284161882 यावर संपर्क साधावा असे सावदा पोलिस स्टेशन तर्फे आवाहन करण्यात येत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत