महावितरणच्या अभय योजनेसाठी मिळाली ३१ मार्चपर्यंतची मुदतवाढ थकबाकी भरली नाही तर कायदेशीर कारवाईचा इशारा
महावितरणच्या अभय योजनेसाठी मिळाली ३१ मार्चपर्यंतची मुदतवाढ
थकबाकी भरली नाही तर कायदेशीर कारवाईचा इशारा
लेवाजगत न्यूज जळगाव:- बिलाच्या थकबाकीमुळे वीज कनेक्शन कायमस्वरूपी तोडलेल्या राज्यातील घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक वीज ग्राहकांसाठी सुरू केलेल्या महावितरण अभय योजना २०२४ ला ग्राहकांच्या मागणीनुसार ३१ मार्च २०२५ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. या योजनेत थकबाकीवरील संपूर्ण व्याज आणि विलंब आकार माफ होत असल्यामुळे वाढीव मुदतीत ग्राहकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे. या योजनेला मुदतवाढ न देण्याचा निर्णय महावितरणने घेतला असून, थकबाकी न भरणाऱ्या ग्राहकांवर कारवाईचा इशारा दिला आहे.
राज्यातील महावितरणच्या ३१ मार्च२०२४ पर्यंत थकीत बिलामुळे कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या (पीडी) ग्राहकांसाठी १ सप्टेंबरपासून अभय योजना सुरू करण्यात आली. योजनेचा कालावधी ३० नोव्हेंबर रोजी संपल्यानंतर ३१ डिसेंबरपर्यंत एक महिन्याची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला; परंतु राज्यातील ग्राहकांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन योजना ३१मार्च २०२५ पर्यंत चालू ठेवण्याचा निर्णय घेतला. यामुळे योजनेत अजूनही सहभार्ग होऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांना दिलास मिळणार आहे. राज्यातील ९३८४८ वीज ग्राहकांनी आतापर्यंत योजनेचा लाभ घेतला आहे. त्यांच्याकडून १३० कोर्ट रुपयांचा भरणा झाला असून, त्यांना ५५ कोटी ३६ लाख व्याज व २ कोटी १२ लाख रुपयांचा विलंब आकार माफ झाला आहे
संबंधित वीज ग्राहकांना असा घेता येईल लाभ :
या वेबसाइटवरून ऑनलाइन पद्धतीने अभय योजनेचा लाभ घेता येईल. महावितरणच्या मोबाइल अॅपवरून योजनेचा लाभ घेता येईल. वीज ग्राहक १९१२ किंवा १८००२३३३४३५ किंवा १८००२१२३४३५ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून माहिती घेऊ शकतात. योजनेनुसार पैसे भरल्यानंतर संबंधित वीज ग्राहकाला पुन्हा एकदा नियमित वीज कनेक्शन घेता येईल. त्याच पत्त्यावर योग्य पुरावे सादर करून नव्या नावाने वीज कनेक्शन घेण्याचीही सुविधा आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत