आयएलटी-२० तिसऱ्या हंगामाचे समालोचन करणार दिग्गज खेळाडू आयएलटी २० क्रिकेट सामन्यांचे समालोचन करणार वीरेंद्र सेहवाग, वसीम अक्रम, वकार युनूस, शोएब अख्तर, हरभजन सिंग, इयान स्मिथ, इयान बिशप, सायमन डौल इतर खेळाडू
आयएलटी-२० तिसऱ्या हंगामाचे समालोचन करणार दिग्गज खेळाडू
आयएलटी २० क्रिकेट सामन्यांचे समालोचन करणार वीरेंद्र सेहवाग, वसीम अक्रम, वकार युनूस, शोएब अख्तर, हरभजन सिंग, इयान स्मिथ, इयान बिशप, सायमन डौल इतर खेळाडू
लेवाजगत न्यूज उरण प्रतिनिधी सुनिल ठाकूर : डीपी वर्ल्ड इंटरनॅशनल लीग टी-२० ची अधिकृत प्रसारक असलेल्या झी एंटरटेनमेंट एंटरप्रायझेस लिमिटेड (झील) या कंपनीने स्पर्धेच्या तिसऱ्या हंगामात प्रेक्षकांना समृद्ध अनुभव मिळवून देण्यासाठी काही उत्कृष्ट क्रिकेट समालोचकांचा ताफा उभा केला आहे. सामन्यांच्या रसभरीत वर्णनाने व माहितीपूर्ण निवेदनाने चैतन्यमय वातावरण निर्माण करून हे दिग्गज समालोचक या हंगामात स्टेडियम्समध्ये मोठा उत्साह निर्माण करणार आहेत. ‘डीपी वर्ल्ड आयएलटी-ट्वेंटी’चा हा तिसरा हंगाम येत्या दि. ११ जानेवारीपासून ९ फेब्रुवारी पर्यंत चालेल.
आयएलटी-२० च्या तिसऱ्या हंगामामध्ये समालोचकांच्या पथकात इयान स्मिथ, इयान बिशप, सायमन डौल, वीरेंद्र सेहवाग, वसीम अक्रम, वकार युनूस, शोएब अख्तर, हरभजन सिंग, नियाल ओ'ब्रायन आणि ॲलन विल्किन्स यांसारखे क्रिकेट आयकॉन असतील. अंजुम चोप्रा, सबा करीम, रोहन गावस्कर, निखिल चोप्रा, डॅरेन गंगा, उरूज मुमताज, विवेक राझदान, रीमा मल्होत्रा आणि अजय मेहरा हे या समालोचनामध्ये सखोल व वैविध्यपूर्ण माहितीची भर घालतील. या सर्वांचा एकत्रित अनुभव आणि इंग्रजी व हिंदी या दोन्ही भाषांमध्ये त्यांच्याकडून सादर होणारी माहिती यांमुळे जगभरातील क्रिकेट चाहत्यांना सामने पाहताना मोठा आनंद मिळणार आहे. त्यांच्यासोबत प्रस्तुतकर्ता म्हणून लॉरा मॅकगोल्डरिक, रिधिमा पाठक आणि अर्जुन पंडित हे डायनॅमिक त्रिकूट सहभागी होणार आहे.
आयएलटी-२० च्या तिसऱ्या हंगामाचा प्रारंभ शनिवार दि. ११ जानेवारी २०२५ रोजी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये एका भव्य उद्घाटन सोहळ्यासह केला जाईल. या प्रसंगी प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी बॉलीवूडचे सुपरस्टार शाहिद कपूर, पूजा हेगडे आणि सोनम बाजवा यांचे संगीत-नृत्याचे व इतर कार्यक्रम होणार आहेत. प्रसिद्ध बॉलीवूड निर्माता आणि अभिनेता जॅकी भगनानी आणि रिधिमा पाठक हेही या उद्घाटन समारंभाला उपस्थित राहणार आहेत. हा सोहळा भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता सुरू होईल आणि क्रिकेटच्या चाहत्यांना ‘झी’ च्या सर्वाधिक वितरीत आणि सर्वात जास्त पाहिल्या जाणाऱ्या १५ वाहिन्यांवर ही ॲक्शन-पॅक्ड टूर्नामेंट पाहता येईल. यंदाच्या स्पर्धेची सुरुवात भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री ८.४५ वाजता होईल. यजमान संघ दुबई कॅपिटल्स व एमआय एमिरेट्स या गेल्या वर्षीच्या दुसऱ्या हंगामातील अंतिम सामन्याच्या विजेत्यांमध्ये यावेळी पुन्हा एकदा लढत होईल.
वसीम अक्रम, माजी दिग्गज वेगवान गोलंदाज, डीपी वर्ल्ड आयएलटी-२० म्हणाला,“डीपी वर्ल्ड आयएलटी-ट्वेंटीमधून माझ्या या तिसऱ्या सत्रात परतताना मी आनंदी आहे. या आखाती प्रदेशाने क्रिकेटमधील अनेक अविस्मरणीय क्षण पाहिले आहेत, त्यातील अनेक माझ्या कारकिर्दीतील ठळक क्षण आहेत. आंतरराष्ट्रीय स्टार्स आणि उदयोन्मुख स्थानिक क्रिकेटपटू यांच्या एकत्र खेळण्याने ‘डीपी वर्ल्ड आयएलटी-ट्वेंटी’चा हा हंगाम निश्चितपणे गाजणार आहे.”
वीरेंद्र सेहवाग, क्रिकेटर, समालोचक, डीपी वर्ल्ड आयएलटी-२० म्हणाला,“मला डीपी वर्ल्ड आयएलटी-ट्वेंटीमधील कार्निव्हलसारखे वातावरण आवडते. हे माझ्यासाठी जणू दुसरे घरच आहे. ‘डीपी वर्ल्ड आयएलटी-ट्वेंटी टूर्नामेंट’मधील सहभागी क्रिकेटपटूंच्या दर्जामुळे आणि ठिकाणांमुळे नेहमीच खूप स्पर्धात्मक असते. हे उत्कृष्ट क्रिकेट सामने आवर्जून पाहण्याचे आवाहन मी माझ्या जगभरातील चाहत्यांना करतो.”
इयान बिशप, क्रिकेटर, म्हणाला, “गेल्या काही वर्षांत या आखाती प्रदेशात क्रिकेटची वाढ झाली, ही आनंदाची बाब आहे. डीपी वर्ल्ड आयएलटी-ट्वेंटी या स्पर्धेच्या माध्यमातून या प्रदेशातील खेळाडूंना संधी व प्रोत्साहन मिळत आहे. स्पर्धेच्या या तिसऱ्या हंगामात पुनरागमन करताना मला खूप आनंद होत आहे.”
आशिष सहगल, डिजिटल - ब्रॉडकास्ट महसूल विभाग, मुख्य विकास अधिकारी, झी एंटरटेनमेंट एंटरप्राइझ लिमिटेड म्हणाले,“डीपी वर्ल्ड आयएलटी-२० च्या तिसऱ्या हंगामासाठी प्रतिष्ठित समालोचकांच्या पॅनेलची घोषणा करताना आम्हाला आनंद होत आहे. या दिग्गजांचे कौशल्य आणि त्यांचे अद्वितीय विचार यांमुळे या प्रीमियर क्रिकेट स्पर्धेतील उत्साह निश्चितच वाढेल. लीगची वाढती प्रतिष्ठा आणि लीगला मिळणारा जागतिक प्रतिसाद या गोष्टी लक्षात घेऊन आम्ही जगभरातील प्रेक्षकांसाठी हा क्रिकेटचा कार्निव्हल सादर करण्यास उत्सुक आहोत.”
क्रिकेटच्या चाहत्यांना ही ॲक्शन-पॅक्ड टूर्नामेंट ‘झी’ च्या सर्वाधिक वितरीत होणाऱ्या व सर्वांत जास्त पाहिल्या जाणाऱ्या १५ टीव्ही वाहिन्यांवर त्याचप्रमाणे, झी-फाईव्ह या भारतातील ओटीटी प्लॅटफॉर्मवरदेखील ही स्पर्धा विनामूल्य पाहता येईल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत