महाराष्ट्रातील६०संपादकांना स्पीड पोष्टने सन्मानपत्र पाठवून जनजागृती सेवा संस्थेने साजरा केला पत्रकार दिन
महाराष्ट्रातील६०संपादकांना स्पीड पोष्टने सन्मानपत्र पाठवून जनजागृती सेवा संस्थेने साजरा केला पत्रकार दिन
लेवाजगत न्यूज बदलापूर(गुरुनाथ तिरपणकर) दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या दर्पण या वृत्तपत्राच्या स्मृती प्रित्यर्थ६जानेवारी हा दिवस महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो.जनजागृती सेवा संस्था ही पत्रकारांचा सन्मान करत असते.त्याच अनुषंगाने६जानेवारी२०२५रोजी महाराष्ट्रातील ६०संपादकांना जनजागृती सेवा संस्थेच्यावतीने सन्मानपत्र व संस्थेचा कार्य अहवाल स्पीड पोष्टने पाठवून सन्मान केला.
पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ,हा स्तंभ मजबूत करण्यासाठी पत्रकार क्षेत्रातील व साहित्य सर्वांचाच हातभार लागलेला असतो.म्हणूनच संस्थेने लेखक,कवी,साहित्यिक,संपादक,स्तंभ लेखक,मुक्त पत्रकार,वृत्तपत्र लेखक,पत्रकार यांना ऑनलाईन पध्दतीने"आकर्षक सन्मानपत्र"पाठवून त्यांचाही सन्मान केला.हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे खजिनदार दत्ता कडुलकर यांनी विशेष परिश्रम घेतले.शेवटी पत्रकार क्षेत्रातील सर्व मान्यवरांचे जनजागृती सेवा संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर यांनी अभिनंदन केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत