Header Ads

Header ADS

सावदा येथे श्री स्वामिनारायण मंदिरामध्ये सोमवार सकाळी शाकोत्सव

Savada-here-in-Shri-Swaminarayan-Mandir-Monday-morning-Shakotsav


 सावदा येथे श्री स्वामिनारायण मंदिरामध्ये सोमवार सकाळी शाकोत्सव 

लेवाजगत न्यूज सावदा -निवासी हरिकृष्ण महाराज राधाकृष्ण देव यांच्या सानिध्यात आणि शास्त्री धर्मप्रसाद दासजी यांच्या वाढदिवसानिमित्त ,शास्त्री भक्ती प्रकाश दासजी यांचे आशीर्वादाने कोठारी स्वामी स्वयंप्रकाश दासजी, धर्म किशोर दासजी, सत्यप्रकाश स्वामी, स्वामी माधव भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली १३ जानेवारी या पौर्णिमेच्या दिवशी श्री स्वामिनारायण मंदिरामध्ये दरवर्षी प्रमाणे ऐतिहासिक शाकोत्सवाचे आयोजन केले आहे. भगवान श्री स्वामिनारायण यांनी लोया गावी स्वतः वांग्याची भाजी बनवून सर्व भक्तांना भाजी-भाकरीचा प्रसाद दिला होता. त्याअनुषंगाने सोमवारी सकाळी साडेसात वाजत शास्त्रीय स्वामी अनंत प्रकाश दास जी कथा वाचन करतील त्यानंतर ते  शाकोत्सव होईल. त्यात सकाळी७.३० ते ८.३० अशी शाकोत्सव कथा होईल. उपस्थितीचे आवाहन श्री स्वामिनारायण मंदिर ट्रस्टी यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.