Header Ads

Header ADS

नायलॉन मांजा विकणाऱ्या एका इसमावर सावदा पोलिसांची कारवाई, सावदा पालिका व पोलीस यांची शहरात नायलॉन मांजा तपासणी सुरू

 

Savda-municipality-and-police-start-investigation-in-nylon-manja-in-city-Savda-police-action-on-a-person-selling-nylon-manja

सावदा पालिका व पोलीस यांची शहरात नायलॉन मांजा तपासणी सुरू

नायलॉन मांजा विकणाऱ्या एका इसमावर सावदा पोलिसांची कारवाई

लेवाजगत न्यूज सावदा -आगामी काळातील मकर संक्रांतीच्या पाश्वभूमीवर सावदा पालिका व पोलीस विभाग यांनी संयुक्तपणे नॉयलॉन मांजाची व्यावसायिक दुकानांवर तपासणी करण्यात आली. सावदा पोलिसांनी आज गुरुवारी  केलेल्या कारवाईत तांबटकर दिल्लीतील एका ६५ वर्षीय इसमावर कारवाई करण्यात आली.

    मकर संक्रातीचा सण जवळ आला असून यानिमित्त अनेक ठिकाणी पतंग उडवण्याचा खेळ खेळला जातो. परंतु पतंगबाजीसाठी जीवाला धोकादायक आणि कायद्याने बंदी असलेल्या नायलॉन मांजाचा सर्रास वापर होतो. मात्र, घातक मांजामुळे निष्पाप जीवांचा नाहक बळी जात असून अनेक दुचाकीस्वारांच्या गळ्याला इजा, तर अनेक बालकांचे हात चिरले आहेत. तर आकाशात उडणाऱ्या पक्षांना ही इजा झाली आहे. त्या अनुषंगाने काल सावदा नगर परिषद व सावदा पोलीस ठाण्याने नायालॉन मांजा तपासणीची धडक कारवाई मुख्याधिकारी भूषण वर्मा व सहायक पोलिस निरीक्षक विशाल पाटील यांचे मार्गदर्शनाखाली केली.

     या कारवाईत मांजा विक्रेत्यांची तपासणी करण्यात आली.तसेच प्रशासनातर्फे विक्रेते व नागरिकांना नायलॉन मांजा न वापरण्याचे आवाहन करण्यात आले. या पथकात लेखापाल विशाल पाटील, पोलीस कॉन्स्टेबल मयूर पाटील, सतीश पाटील, अविनाश पाटील, हमीद तडवी, कार्तिक ढाके, अरुणा चौधरी आदी सहभागी होते.

    दुसऱ्या दिवशी सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार तांबटकर गल्लीत नायलॉन मांजा विक्री होत असल्याचे कळाल्यावर त्यांनी त्या मार्गदर्शनाखाली कॉन्स्टेबल मयूर पाटील यांनी त्या भागात जाऊन तपासणी केली असता गुरुवार रोजी तांबटकर गल्लीतील ६५ वर्षीय इसमावर मयूर पाटील यांच्या फिर्यादीवरून कारवाई करण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.