कल्याण येथील लेवा पाटीदार समाज मंडळाचे वार्षिक स्नेहसंमेलन सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी उत्साहात झाले साजरे
कल्याण येथील लेवा पाटीदार समाज मंडळाचे वार्षिक स्नेहसंमेलन सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी उत्साहात झाले साजरे
लेवा जगत न्यूज कल्याण-दिनांक 12/01/2025 रोजी लेवा पाटीदार समाज मंडळ कल्याण चा वार्षिक स्नेहसंमेलन मेळावा शारदा विद्या मंदिर लालचौकी कल्याण (प) येथे पार पडला.
या कार्यक्रमांमध्ये समाजातील सुमारे १५०० बंधू भगिनी उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला समाजातील बालगोपाळांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले त्याचा समाज बांधवांनी मनमुराद आनंद लुटला तदनंतर व्यासपीठावर प्रमुख पाहुणे डॉ. प्रा. शिरीष भागवत पाटील, डॉ. जयंत रमेश चौधरी, प्रसिद्ध बिल्डर श्री रत्नाकर चौधरी यांना व्यासपीठावर आमंत्रित करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक राजेश भंगाळे यांनी केले तसेच समाज मंडळाचे अध्यक्ष श्री हेमंत अशोक चौधरी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी कल्याण मधील जास्तीत जास्त समाजबांधवांनी या कऱ्यमसास येवून आपापल्या विचारांचे आदानप्रदान केले पाहिजे असे आवाहन समाजास केले.
सदर कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्वलनाने करण्यात आली.विद्येची देवता श्री सरस्वती मातेचे पूजन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि लेवा पाटील समाजाचे प्रेरणास्थान असणारे सरदार वल्लभभाई पटेल,कवियत्री बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. याप्रसंगी
प्रमुख पाहुणे डॉ.प्राचार्य श्री.शिरीष पाटील, डॉ. जयंत रमेश चौधरी प्रसूतितज्ज्ञ, स्त्रीरोगतज्ञ, लॅपरोस्कोपिक सर्जन तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री. रत्नाकर बळीराम चौधरी मुंबई येथील बांधकाम व्यावसायिक यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी लेवा पाटील समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
"आपल्याआजच्या वार्षिक स्नेहसंमेलनात रोटरी क्लब ऑफ सेंट्रल कल्याण, व डॉ विजय महाजन संस्थापक अध्यक्ष असलेल्या इंदाला शैक्षणिक समूह यांच्या संयुक्त विद्यमाने ईशा नेत्रालय कल्याण यांचेकडून आपल्या समाजातील जेष्ठ समाज बंधू आणि भगिनींची नेत्र तपासणी व दंत चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले त्यात मोफत चष्मे वाटप करण्यात आले.
महिलांसाठी आयोजित लकी ड्रॉ च्या माध्यमातून पैठणी साड्यांचे,तसेच गुणगौरव व विशेष प्रविण्य मिळवलेल्या मुलांचे सत्कार व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षिस व सन्मान चिन्ह देऊन करण्यात आले.
लेवा पाटील समाजाची 'माती, नाती आणि संस्कृती' हीच आपली खरी ओळख आहे आणि या स्नेहसंमेलनाने त्या ओळखीला दुजोरा देण्यात आला. समाजाच्या एकतेला नव्या पिढीसोबत आणण्यासाठी बालगोपालांच्या नृत्य -गायन कार्यक्रमातील उत्स्फूर्त सहभाग महत्त्वपूर्ण ठरला.
लेवा पाटीदार समाज मंडळ कल्याण ह्यांनी या स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून समाजाच्या एकतेला अखंडतेला नव्याने आकार देण्याचा मनापासून प्रयत्न केला. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिसरातील लेवाबांधव,डॉक्टर्स, व्यावसायिक, समाजसेवक ह्यांचे अत्यंत मोलाचे सहकार्य लाभले. समाजातील दानशूर सदस्यांनी स्वतःहून विविध गोष्टीसांठी देणगी देऊन मंडळाच्या ह्या सामाजिक उपक्रमाला मोठी साथ दिली. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी लेवा पाटीदार समाज मंडळ कल्याण चे सर्व कार्यकर्ते, सदस्य,नियोजन समितीतील सर्व युवा कार्यकर्ते या सर्वांनी खूप मेहनत घेतली.तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळाचे सहसचिव श्री दीपक नेमाडे व सौ. प्रतिभा भारंबे मॅडम यांनी आपल्या खुमासदार शैलीत अतिशय चांगल्याप्रकारे केले.
समाजातील सर्व वयोगटाच्या लोकांनी सामूहिक रूपाने या स्नेहसंमेलनात सहभाग घेत कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला,त्यामुळे कार्यक्रम यशस्वी झाला.सामाजिक व संस्कृतिक विविधतेला मान देत बालगोपालांच्या कलाविष्काराने सर्वांना मंत्रमुग्ध केले सामूहिक स्पर्धा, विशेष प्रविण्य सत्कार आणि अस्सल लेवा पाटील पद्धतीचे वरण बट्टी वांग्याची भाजी हे पारंपरिक भोजन उपस्थितांमध्ये आनंद, व उत्साह निर्माण करणारे ठरले.जे समाज बांधव या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाही त्यांच्या साठी "येऊन तर बघा" हे डॉ.जयंत चौधरी यांनी आपल्या भाषणात सांगितलेली टॅग लाईन आहे.या टॅगलाईनचा आपण पुढील कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्यासाठी नक्की विचार करावा असे आवाहन केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत