Contact Banner

धनाजी नाना महाविद्यालयात वार्षिक स्नेह संमेलन "धनोत्सव" निमित्त विविध स्पर्धांचे आयोजन

 धनाजी नाना महाविद्यालयात वार्षिक स्नेह संमेलन "धनोत्सव" निमित्त विविध स्पर्धांचे आयोजन



Various competitions organized on the occasion of the annual love gathering and Dhanutsav at Dhanaji Nana College


लेवाजगत न्यूज फैजपूर -येथील तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालय येथे वार्षिक स्नेहसंमेलन धनोउत्सव २०२४-२५ यानिमित्ताने  विद्यार्थ्यांसाठी रांगोळी, मेहंदी, नेल आर्ट, केशरचना, वकृत्व, काव्यवाचन व चित्रकला अशा विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विविध स्पर्धांमध्ये जवळपास ११० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. स्पर्धेचे परीक्षण करण्यासाठी महाविद्यालयातील प्राध्यापकांचे मोलाचे सहकार्य लाभले. या स्पर्धेसाठी संस्थेचे पदाधिकारी, प्राचार्य, उपप्राचार्य यांचे मार्गदर्शन लाभले. विविध स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यासाठी सर्व समिती सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.