राष्ट्रवादीचे माजी आमदार तुकाराम बिडकर यांचे अपघाती निधनः मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन परतत असताना दुचाकीला धडक
राष्ट्रवादीचे माजी आमदार तुकाराम बिडकर यांचे अपघाती निधनः मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन परतत असताना दुचाकीला धडक
लेवाजगत न्यूज अकोला:- राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार तथा विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष तुकाराम बिडकर यांचे निधन झाल्याची माहिती आहे. अपघातात त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. ते गुरुवारी दिनांक १३ फेब्रुवारी रोजी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन परतत होते. तेव्हा शिवर येथे त्यांच्या गाडीला भीषण अपघात झाला ज्यात त्यांचा मृत्यू झाला आहे.
एका पिकअप गाडीने तुकाराम बिडकर यांच्या दुचाकीला धडक दिल्याने तुकाराम बिडकर आणि त्यांच्यासोबत असलेले त्यांचे मित्र राजदत्त मानकर या दोघांना मोठी दुखापत झाली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला आहे. तर त्यांच्या मित्राबाबत अद्याप कुठलीही माहिती नाही.
अकोलामधील शिवणी शिवर गावाजवळील पेट्रोल पंपासमोर एका मालवाहू वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. अकोला विमानतळावर भाजप प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बावनकुळे यांना विमानतळवर भेटले होते. बावनकुळे यांना भेटून बिडकर दुचाकीने घरी येत होते.
बिडकर यांची दुचाकी शिवर गावाजवळ आली असताना त्यांच्या दुचाकीला मालवाहू टेम्पोने धडक दिली. अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
तुकाराम बिरकड यांनी २००४ ते २००९ या काळात आमदार होते. मुर्तीजापूर मतदारसंघाचे ते आमदार होते. काँग्रेस राष्ट्रवादी सरकारच्या काळात होते विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष होते. विदर्भातील राष्ट्रवादी काँग्रेसचा माळी समाजातील मोठा चेहरा होते. आमदार होण्याआधी तुकाराम बिडकर अकोला जिल्हा परिषदेत सभापती होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत