Contact Banner

संगीतमय रामायण कथेचे सावदा येथे रविवार पासून आयोजन

 

Musical-Ramayana-story- at- Savda-from-Sunday- organized-story-talker-Vishwprakash-Dasji

संगीतमय रामायण कथेचे सावदा येथे रविवार पासून आयोजन
शास्त्री स्वामी विश्वप्रकाश दासजी


लेवाजगत न्यूज सावदा:- येथील त्रिमूर्ती मुंजोबावाडी सप्ताह समितीतर्फे शास्त्री स्वामी विश्व प्रकाश दासजी यांच्या वाणीतून त्रिमूर्ती मुंजोबा वाडी येथे संगीतमय रामायण कथेचे आयोजन करण्यात आले आहे.तरी भाविकांनी कथा श्रवणाचा लाभ घावा.

    दरवर्षीप्रमाणे सावदा येथील त्रिमूर्ती मुंजोबावाडी सप्ताह समितीतर्फे संगीतमय रामायण कथेचे आयोजन दिनांक २ फेब्रुवारी रविवार पासून शास्त्री स्वामी विश्वप्रकाश दासजी यांच्या वाणीतून सात दिवस होणार आहे.कथा रोज संध्याकाळी रात्री ७ ते १०:३० कथेची वेळ असून सांगता दिनांक ८ फेब्रुवारी शनिवार रोजी असून या सप्ताहात रविवार रोजी श्री शिवविवाह, सोमवार रोजी श्री राम जन्मोत्सव ,मंगळवार रोजी  सीता स्वयंवर,बुधवार रोजी श्री राम भरत मिलाप, गुरुवार रोजी श्री केवट प्रसंग, शुक्रवार रोजी श्री रामेश्वर स्थापना, शनिवार रोजी श्री रामराज्यभिषेक व दिनांक ९ पंचवीस रविवार सकाळी काल्याचे किर्तन होणार आहे. 

     तरी सर्व भाविक भक्तांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे व या धार्मिक संगीतमय रामायण कथेचा लाभ घ्यावा असे आयोजक त्रिमूर्ती मुंजोबावाडी सप्ताह समिती, नवयुग गणेश मंडळ,राणा गणेश मंडळ,बालगोपाळ गणेश मंडळ व स्वराज्य गणेश मंडळ यांनी केले आहे. या सप्ताह दरम्यान दिनांक ४ फेब्रुवारी रोज मंगळवारी श्री स्वामीनारायण मंदिराचे सद्गुरु श्री घनश्याम कोठारी यांना भगवान स्वामीनारायण सेवा करण्यात पन्नास वर्षे झाल्यामुळे त्यांचे गूळ तुला लक्ष्मण सोनू वारके व सुनील वारके व ध्रुव वारके यांच्यामार्फत केली जाणार आहे. 

   तरी या सर्व कार्यक्रमास सर्व हरिभक्तांनी व भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहनही करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.