राजुरा बाजार येथील बसस्थानक लवकरच प्रवाशांच्या सेवेत...
राजुरा बाजार येथील बसस्थानक लवकरच प्रवाशांच्या सेवेत...
लेवाजगत न्युज वरुड (निलेश लोणकर ):- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या गाव तिथे एसटी प्रवाशाच्या सेवेसाठी जाऊन प्रवाशांना व विद्यार्थांचा प्रवास सुरक्षीत होत आहे. अश्याच हिरव्या मिर्चिसाठी रात्रीची प्रसिद्ध असलेली बाजार पेठ आहे.
राजुरा बाजारची लोकसंख्या ही दहा हजाराच्या वर असून येयून वर्धा जिल्हातील वर्धा, पुलगाव, आर्वी, आष्टी, तळेगाव, नागपूर जिल्हा तिल थडीपवनी, तारासावंगा तसेच अमरावती जिल्हातिल उदापूर, खानापूर, देऊतवाडा, पवनी (स), चिंचरगव्हाण, मोरचुंद, घोराड यासह इतरही गावात गावातील नागरीकांची व विद्यार्थाची राजुरा बाजार येथे मोठ्या प्रमाणात वर्दळ असते परंतु दररोज हजारो लोकांसह प्रवाशांची वर्दळ असणाऱ्या प्रवाशांना मात्र एसटी बसची उनवारा पावसामध्ये रस्तावरच उभे राहुन वाट पहा लागत होती. याची दखल घेत एसटी महामंडळाने प्रवाशांच्या सेवेसाठी हे बिद्र घेऊन राजुरा बाजार येथे बसस्थानक उभारले असून ते लवकरच प्रवाशांच्या सेवेत रुजु होणार असल्याची माहिती महामंडळाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
राजुरा बाजार बसस्थानकावर कर्मचाऱ्यांची नियुक्ती - निलेशकुमार बेलसरे विभाग नियंत्र अमरावती
अत्यंत वर्दळीच्या असलेल्या राजुरा बाजार येथील बसस्थानक लवकरच प्रवासी वाहतुकीसाठी खुले करण्यात येणार असून या बसस्थानकार एका कर्मचाऱ्याची नियुक्ती सुद्धा करण्यात आली आहे. तसेच बसस्थानकाच्या सरक्षण भिंतीचे कामही लवकरात लवकर सुरू होवुन प्लोरिंग सुद्धा करण्यात येणार असुन प्रवाशांना दर्जेदार सेवा उपलब्ध होणार असल्याची माहिती विभाग नियंत्रक निलेशकुमार बेलसरे यांनी दिली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत