Contact Banner

पालकमंत्री व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष ? डोंगरकठोरा ते श्री क्षेत्र डोंगरदे रस्त्यातील खड्डे संतांनी लोकसहभागातून बुजवले

 


The potholes on the Dongar Kathora-to-Shri Kshetra Dongarde road, neglected by the guardian minister and people's representatives, were filled by saints through public participation.


पालकमंत्री व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष ?

डोंगरकठोरा ते श्री क्षेत्र डोंगरदे रस्त्यातील खड्डे संतांनी लोकसहभागातून बुजवले


लेवाजगत न्यूज  फैजपूर- यावल तालुक्यातील श्री क्षेत्र डोंगरदे या ठिकाणी १० ते ११ फेब्रुवारीला दोन दिवसीय प्रतिवर्षीप्रमाणे उत्सव होणार आहे. दोन दिवस होणाऱ्या या धार्मिक उत्सवात दरवर्षी शेकडो भाविक दर्शणार्थ येत असतात.मात्र, मंदिरात ये-जा करण्यासाठी असलेल्या डोंगर कठोरा ते डोंगरदे या पाच किलोमीटर अंतराच्या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने गैरसोय वाढली होती. यासाठी लोकसहभागातून श्री पंत मंदिराचे गादीपती स्वरूपानंद शास्त्री यांच्या आवाहनावरून दात्यांनी पुढाकार घेऊन हे खड्डे लोकसहभागातून बुजण्यात आले.


यासाठी स्वरूपानंद महाराज यांनी स्वतः पुढाकार घेतला. या कामासाठी काही शेतकऱ्यांनी स्वतःचे ट्रॅक्टर विनामूल्य उपलब्ध करून दिले. योगेश पाटील, कांचन पाटील, नीलेश पाटील, ललित बोंडे, रमेश कोलते (न्हावी) यांच्यासह इतरही शेतकऱ्यांनी सहकार्य केले. या परिसरातील पुरातन श्रद्धास्थान असलेले हे धार्मिक स्थळ दुर्लक्षित झाले असून याकडे प्रशासनासह लोकप्रतिनिधींचा चेही दुर्लक्ष झाले आहे येथे दर्शणार्थ येणाऱ्या भाविकांना डोंगर कोठारा ते डोंगरदे या पाच किलोमीटर रस्त्याने जाताना गेल्या वर्षापासून खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. ही या तीर्थक्षेत्राची भेडसावणारी समस्या जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील व जिल्ह्याचे संपर्क मंत्री गिरीश महाजन व जिल्ह्याचे आमदार यांनी याकडे लक्ष देऊन हा पाच किलोमीटर रस्ता डांबरीकरण करून द्यावा अशी मागणी ही भाविकांकडून वेळोवेळी होत आहे. मागील वेळी संतांनी ही प्रवचनाच्या सांगते समयी या रस्त्याबाबत खुलासा केलेला होता. तरीपण एक वर्षापर्यंत या रस्त्याचे कामकाज व गड्डे बुजवण्यात आले नाही.त्यामुळे भाविकांमध्ये नाराजीचा सूर आहे.

  या महिन्यात दोन दिवसीय होणारे हे धार्मिक कार्यक्रम असल्याने लोकसहभागातून तात्पुरती डाग डुगी करून रस्ता भाविकांसाठी तयार करण्यात आला आहे. यावेळी ज्या दात्यांनी सहभाग घेतला त्यांचेही भाविकांनी आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.