आकाशातून कोसळला घराच्या स्लॅबवर ५० किलोचा धातूचा तुकडा,४ फूट लांबीचा तुकडा उपग्रहाचा असण्याची शक्यता
आकाशातून कोसळला घराच्या स्लॅबवर ५० किलोचा धातूचा तुकडा,४ फूट लांबीचा तुकडा उपग्रहाचा असण्याची शक्यता
लेवाजगत न्यूज नागपूर -"नागपूर जिल्ह्यातील उमरेड शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. कोसे ले-आऊट परिसरात आकाशातून एक जड धातूचा तुकडा कोसळला. हा तुकडा अमेय भास्कर बसेशंकर यांच्या घराच्या स्लॅबवर पडला. खगोल अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी या तुकड्या बाबत उपग्रहाचा असण्याची शक्यता वर्तवली आहे."
"घटनेच्या वेळी मोठा स्फोटासारखा आवाज झाला. त्यामुळे परिसरातील नागरिक घाबरून घराबाहेर धावले. कोसळलेला धातूचा तुकडा सुमारे ५० किलो वजनाचा आहे. तो १० ते १२ मिमी जाडीचा आणि सुमारे ४ फूट लांबीचा आहे. तुकडा अर्धवट तुटलेल्या अवस्थेत असून, त्यामुळे घराच्या स्लॅबला आणि भिंतीला किरकोळ नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही."
"अमेय यांनी लगेच उमरेड पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिस निरीक्षक धनाजी जळक यांच्या नेतृत्वाखाली पोलिस पथकाने घटनास्थळी तपासणी केली. प्राथमिक तपासणीत या धातूच्या तुकड्यामध्ये कोणतीही स्फोटक सामग्री आढळली नाही. सुरक्षिततेच्या दृष्टीने हा तुकडा पुढील तपासणीसाठी नागपूर फॉरेन्सिक प्रयोगशाळेत पाठवण्यात आला आहे."
कोणत्याही टिप्पण्या नाहीत