निंभोरा गावात खळबळ, सापडलेल्या प्रेताबाबत ग्रामस्थांमध्ये प्रश्नचिन्ह युवकाचा मृतदेह काढताना विहिरीत पुन्हा एक दुसरा मृतदेह आढळला
निंभोरा गावात खळबळ, सापडलेल्या प्रेताबाबत ग्रामस्थांमध्ये प्रश्नचिन्ह
युवकाचा मृतदेह काढताना विहिरीत पुन्हा एक दुसरा मृतदेह आढळला
लेवाजगत निंभोरा-येथील उज्ज्वल नरेंद्र पाटील यांच्या विहिरीत निंभोरा येथील देवेंद्र सोनवणे (यावलकर) या तरुणाने दोन ते तीन दिवसांपूर्वी विहिरीत उडी घेत आत्महत्या केली. याच विहिरीत एक पुरुषाचा सांगाडाही सापडल्याची माहिती मिळाली, त्यामुळे संबंधित व्यक्ती कोण असा प्रश्न गावात उपस्थित केला जात असून या घटनेमुळे निंभोरा गावात खळबळ निर्माण झाली आहे.
निंभोरा तालुका रावेर येथील उज्ज्वल नरेंद्र पाटील यांच्या विहिरीत निंभोरा येथील तरुण देवेंद्र सोनवणे(यावलकर) यांनी तीन ते चार दिवसांपूर्वी आत्महत्या केली. त्यांचे मृतदेह काढताना विहिरीत उतरलेल्या पाणबुड्यांनी अजून एक मानवी शरीराचा सांगाडा आढळून आला. त्यामुळे गावात खळबळ उडाली. निंभोरा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक हरिदास बोचरे यांच्या मार्गदर्शनाखाली किरण जाधव, अविनाश पाटील यांनी सांगाडा बाहेर काढून तो ग्रामीण रुग्णालय रावेर येथे डॉ. शुभांगी चौधरी व निंभोरा प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. पाटील यांनी शवविच्छेदन करून पुढील तपासणीसाठी जळगाव जिल्हा रुग्णालयात पाठवला. सापडलेल्या दुसऱ्या मृतदेहाबाबत चौकशी करण्यात यावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
यापूर्वी गावातील दोन व्यक्ती झाल्या बेपत्ता
यापूर्वी गावातील दोन व्यक्ती हरवले असून त्यापैकीच सांगाडा असावा अशी गावात चर्चा सुरू आहे. मात्र याबाबतचा अहवाल आल्यानंतरच खऱ्या अर्थाने याबाबतीत चित्र स्पष्ट होईल. मात्र हा सापळा एखाद्या पुरुषाचा असल्याचा प्रत्यक्ष पाहणाऱ्यांनी सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत