सावदा ते हतनुर रस्त्यावरील खड्ड्यांनी प्रवास झाला धोकादायक
सावदा ते हतनुर रस्त्यावरील खड्ड्यांनी प्रवास झाला धोकादायक
लेवाजगत न्यूज सावदा-येथून मुक्ताईनगर ,वरणगाव व फॅक्टरी येथे जाणाऱ्या सावदा ते हतनुर या महत्त्वाच्या डांबरी रस्त्यावर खड्यांच्या व दुरुस्तीच्या अभावी वाहनधारकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या रस्त्याचा वापर दररोज हजारो वाहन धारक करतात, मात्र काही महिन्यांपासून या मार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहेत, ज्यामुळे वाहनांचे नुकसान होण्याचा धोका वाढला आहे. रस्त्यावरील या खराब स्थितीमुळे प्रवास करणे कठीण झाल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये व व्यापाऱ्यांमध्ये संताप वाढला आहे.
सावदा ते हतनुर या मार्गावरच्या खड्यामुळे वाहनांचे टायर फुटणे, बाईक खराब होणे आणि दुचाकीस्वारांना अपघात घडण्याचा धोका निर्माण होत आहे. स्थानिक वाहनचालक सार्वजनिक बांधकाम खात्याकडून या दुरुस्ती कामासाठी वारंवार मागणी करत असताना, अद्याप योग्य ती कारवाई झालेली नाही. “रस्ता इतका खराब आहे की, बाईक चालवणं कठीण झाले आहे,” अशी तक्रार एका स्थानिक बाईक चालकाने व्यक्त केली.
सावदा ते हतनुर रस्त्यावरील या समस्येबाबत स्थानिक प्रशासन कर्मचारी व लोकप्रतिनिधी या मार्गाचा उपभोग या परिसरात येण्यासाठी घेतात. स्थानिक नागरिक आणि व्यापारी यांचे म्हणणं आहे की, “हा रस्ता महत्त्वाचा आहे, त्यामुळे त्याची तातडीने दुरुस्ती होणं गरजेचं आहे, नाही तर पूर्ण परिसराचा वाहतुकीवर परिणाम होईल.”
या रस्त्याचा दुरुस्ती अभाव केवळ वाहनचालकांपुरता मर्यादित नसून, शेतकरी, विद्यार्थी आणि इतर सामान्य प्रवाशांनाही अडचणीत आणत आहे. शिक्षण, मेडिकल इमरजेन्सी साठी या परिसरातील नागरिकांना सावदा येथे दररोज यावे लागते. तसेच हा रस्ता स्थानिक बाजारपेठेशी जोडणारा एक मुख्य मार्ग असल्याने व्यापारही प्रभावित होत आहे.
स्थानक प्रशासनासमोर याबाबत स्थित्यंतराने उपाययोजना करण्याची गरज आहे. तातडीने खड्डे भरून आणि रस्त्याचे पुन्हा डांबरीकरण करण्याचे काम सुरू करणे आवश्यक आहे. यामुळे वाहनचालकांच्या सुरक्षिततेसह स्थानिकाच्या आर्थिक विकासालाही चालना मिळेल. “जर प्रशासनाने वेळेत काम केले नाही तर लोकांनी मोठ्या प्रमाणात आंदोलन करावे लागेल,” असे वाहनधारकांचे म्हणणे आहे.
सावदा ते हतनुर रस्त्यावरील या गंभीर समस्येवर तातडीने लक्ष देऊन हा रस्ता सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे. स्थानिक प्रशासनाने नागरिकांच्या त्रासातून योग्य धडे घेतले पाहिजेत, जेणेकरून या भागातील वाहन धारक समाधानी होईल.
--
कोणत्याही टिप्पण्या नाहीत