Header Ads

Header ADS

Nashik News: साखरपुड्यात नवरीची सर्वांसमोर बॉयफ्रेण्डला मिठी, खचलेल्या IT अधिकाऱ्याने आयुष्य संपवलं, नाशकात खळबळ


 Nashik News: साखरपुड्यात नवरीची सर्वांसमोर बॉयफ्रेण्डला मिठी, खचलेल्या IT अधिकाऱ्याने आयुष्य संपवलं, नाशकात खळबळ


लेवाजगत न्युज नाशिक:-

नाशिकमध्ये इन्कम टॅक्स अधिकाऱ्याने आपल्या आयुष्याची अखेर केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. साखरपुड्यात एक अशी घटना घडली ज्यामुळे या आयटी अधिकाऱ्याने आपलं आयुष्य संपवलं. साखरपुड्यात होणाऱ्या बायकोने सर्वांसमोर आपल्या प्रियकराला मिठी मारली आणि त्यांचे प्रेम प्रकरण उघडकीस आलं. त्यानंतर नवरीच्या त्रासाला कंटाळून नाशिकमध्ये कार्यरत असलेल्या इन्कम टॅक्स अधिकारी असलेल्या नवरदेवाने आपली जीवन यात्रा संपवली. याप्रकरणी नाशिकमध्ये नवरी सह तिचा प्रियकर आणि एका संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हरेकृष्ण पाण्डेय असे आपलं आयुष्य संपवलेल्या अधिकाऱ्याचं नाव आहे.


वाराणसी येथे झालेल्या साखरपुड्यात नवरीने तिच्या प्रियकराला मिठी मारल्यानंतर त्यांचे प्रेमप्रकरण उघडकीस आले. पुढे नवरीने हुंडा प्रकरणात अडकविण्याची धमकीही दिली. त्यामुळे नाशिकमध्ये कार्यरत असलेल्य इन्कम टॅक्स अधिकारी नवरदेवाने गळफास लावून घेत आपल्या आयुष्याची अखेर केल्याचं उघडकीस आलं आहे.


नाशिकमध्ये कार्यरत असलेले इन्कम टॅक्स अधिकारी हरेकृष्ण पाण्डेय यांचा वारणसी येथील मोहिनीशी साखरपुडा झाला होता. या कार्यक्रमात तिने तिच्या प्रियकर सुरेश पाण्डेयला मिठी मारली होती. त्यानंतर या दोघांचे प्रेमसंबंध असल्याचं हरेकृष्ण यांना कळाले. हरेकृष्ण यांनी मोहिनीला सांगितलं की, तू त्याला सोडून दे तरच तुझ्याशी लग्न करेन. यावर मोहिनीने हरेकृष्ण यांना धमकी दिली. ती म्हणाली की, मी त्याला सोडणार नाही. मात्र, तू जर माझ्यासोबत लग्न केले नाही, तर तुझ्यासह कुटुंबियांवर हुंडा मागितल्याची तक्रार दाखल करेल. ही वारंवार हरेकृष्ण यांना धमकी देत होती.

मोहिनीच्या धमकीने हरेकृष्ण पाण्डेय यांना मानसिक त्रास होत होता. त्यांनी तणावाखाली येऊन आपली जीवन यात्रा संपवली. याप्रकरणी नवरीसह तिचा प्रियकर आणि एका संशयिताविरोधात नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


हरेकृष्ण पाण्डेय यांचा आज शुक्रवारी १८ एप्रिल रोजी वाराणसी येथे विवाह होणार होता. मात्र, लग्न होण्यापूर्वीच त्यांनी आपली जीवन यात्रा संपवल्याने इन्कमटॅक्स विभागात हळहळ व्यक्त होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.