Contact Banner

चिनावल येथे रामनवमी निमित्त आज पालखी व सहिभले मिरवणूक असते लक्षवेधी

 

Today, the palanquin and accompanying procession are eye-catching on the occasion of Ram Navami in Chinaval.


चिनावल येथे रामनवमी निमित्त आज पालखी व सहिभले मिरवणूक असते लक्षवेधी 

चिनावल ता.रावेर ( लेवाजगत न्यूज वार्ताहर ):-  चिनावल येथे श्रीराम जन्मोत्सव सोहळा येथील श्रीराम मंदिरात उत्साहात पार पडला तर आज दिनांक सात रोजी भव्य महाप्रसाद व रामपालखीचे आयोजन करण्यात आले आहे. 

     येथील पुरातन श्री राम मंदिरात आज सहा रोजी दुपारी बारा वाजता श्रीराम जन्मोत्सव सोहळा उत्सव पार पडला या निमित्ताने आज दिनांक ७ एप्रिल रोजी संपूर्ण गावाला महाप्रसादाचे आयोजन समस्त ग्रामस्थांतर्फे सकाळी आठ ते बारा या वेळेत करण्यात आले आहे. तर येथील श्रीराम मंदिराच्या परंपरेनुसार दरसाल निघणाऱ्या रामपालखीची मिरवणूक संध्याकाळी सात ते दहा या वेळेत गावातील प्रमुख मार्गावरून मंगल वाद्य व दिंडी सोहळ्याने होणार आहे यावेळी या मंदिराची आख्यायिका असल्याप्रमाणे येथे नवस बोलल्याने पुत्रप्राप्ती होते व पुत्र प्राप्त झाल्यानंतर रामनवमीच्या दुसऱ्या दिवशी रामपालखी सोबत अशा मुलांचे श्रीकृष्ण रूप देऊन सही भाले म्हणून मिरवणूक काढली जाते हे मिरवणूक लक्षवेधी असते याच दिवशी येथे यात्रा पण असते. 

     श्रीराम नवमी निमित्त आयोजित सकाळी महाप्रसाद संध्याकाळी भव्य राम पालखी मिरवणूक व सहिभले मिरवणूक हो होणार असल्याने ग्रामस्थांनी या उत्साहाचा लाभ घ्यावा असे आवाहन समस्त ग्रामस्थांनी केले आहे .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.