Header Ads

Header ADS

UPSC परीक्षेचा निकाल जाहीर; शक्ती दुबे अव्वल, तर महाराष्ट्रातील अर्चितचाही तिसरा क्रमांक!

 

UPSC-parīkṣēcā-nikāla-jāhī-śaktī-dubē-avvala-tara-mahārāṣṭrātīla-arcitacāhī-tisarā-kramāṅka


UPSC परीक्षेचा निकाल जाहीर; शक्ती दुबे अव्वल, तर महाराष्ट्रातील अर्चितचाही तिसरा क्रमांक!

लेवाजगत न्यूज पुणे- केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) नागरी सेवा परीक्षा, २०२४ चा अंतिम निकाल जाहीर केला आहे. सप्टेंबर २०२४ मध्ये लेखी परीक्षा झाली होती. तर, जानेवारी ते एप्रिल २०२५ मुलाखती पार पडल्या होत्या. अखेर या दोन्ही सत्रांचा निकाल जाहीर झाला असून युपीएससी परीक्षेत शक्ती दुबे देशात अव्वल ठरली आहे. त्यानंतर हर्षिता गोयल दुसऱ्या क्रमांकावर आणि अर्चित डोंगरे तिसऱ्या क्रमांकावर आहेत. नागरी सेवा परीक्षा नियम, २०२४ च्या नियम २०(४) आणि (५) नुसार २३० उमेदवारांची एकत्रित राखीव यादी देखील ठेवण्यात आली आहे.


प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने अधिकृतपणे जाहीर केलेल्या निकालांमध्ये भारतीय प्रशासकीय सेवा (IAS), भारतीय परराष्ट्र सेवा (IFS), भारतीय पोलिस सेवा (IPS) आणि केंद्रीय सेवा, गट ‘अ’ आणि गट ‘ब’ मध्ये नियुक्तीसाठी शिफारस केलेल्या १००९ उमेदवारांची यादी समाविष्ट आहे. upsc.gov.in या संकेतस्थळावर उमेदवारांना निकाल पाहता येणार आहे.


युपीएससीने २०२४ च्या परीक्षेसाठी आयएएस, आयपीएससह एकूण ११३२ पदांसाठी भरती जाहीर केली होती. यामध्ये १००९ उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. यापैकी ७२५ पुरुष उमेदवार आणि २८४ महिला उमेदवारांचा समावेश आहे.

१००९ उमेदवारांपैकी ३३५ उमेदवार जनरल कॅटगेरी, १०९ उमेदवार आर्थिक दुर्बल घटक (EWS), ३१८ उमेदवार इतर मागासवर्गीय (OBC), १६० अनुसूचित जाती (SC), ८७ अनुसुचित जमाती (ST) प्रवर्गातील आहेत. तर, ४५ उमेदवार दिव्यांग श्रेणीतील आहेत. सप्टेंबर २०२४ युपीएससीच्या परीक्षा झाल्या. तर,७ जानेवारी २०२५ पासून मुलाखतींना सुरुवात झाली.

महाराष्ट्राचे अनेक उमेदवार विजयी

दरम्यान, युपीएससीच्या पहिल्या क्रमांकात महाराष्ट्रातील अर्चित डोंगरेचाही क्रमांक आला आहे. त्याने तिसरा क्रमांक पटकावला असून तो मुळचा पुण्याचा आहे. तर, ठाण्यातील तेजस्वी देशपांडे हिने ९९ वा क्रमांक पटकावला असून ठाण्याच्याच अंकिता पाटीलनेही ३०३ क्रमांक मिळवला आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.