बुऱ्हाणपूर येथे स्वराज्य रक्षक धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे भव्य स्मारक उभारा
बुऱ्हाणपूर येथे स्वराज्य रक्षक धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे भव्य स्मारक उभारा
लेवाजगत न्युज मुक्ताईनगर:-
महाराष्ट्राच्या आणि मराठ्यांच्या इतिहासातील सर्वात संघर्षमय पर्व आणि दैदिप्यमान बलिदान म्हणजे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज.
ज्या आग्रयाने छत्रपती श्री. शिवाजी महाराज आणि छत्रपती श्री. संभाजी महाराज यांच्या रूपाने स्वाभिमानाला आणि महाराष्ट्राच्या गरजलेल्या नरसिंह शिवगर्जनेला पाहीले त्या आग्राला छत्रपती श्री. शिवाजी महाराज यांची मूर्ती स्थापनेचा निर्णय जो आपण घेतला त्याबद्दल खरं तर श्री. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि हा अवघा महाराष्ट्र आपला ऋणी आहे.
शिवछत्रपर्तीच्या नंतर या हिंदवी स्वराज्याची धूरा आपल्या खांद्यावर समर्थपणे सांभाळणारे शिवपुत्र शंभूराजे यांचे एक स्मारक बुरहाणपुरला सुध्दा व्हायला हवे. छत्रपती म्हणून अभिषिक्त होताच व्दितीय छत्रपती श्री. संभाजी महाराजांची पहिली मोहीम म्हणजे बुरहाणपुर, औरंगजेबला या महाराष्ट्रात सर्व शक्तिनिशो येण्यासाठी कारण ठरलेली मोहिम म्हणजे बुरहाणपुर हेच नव्हे तर नऊ वर्षे या हिरव्या आक्रमणाशी झुंज देत हिंदवी स्वराज्यासाठी आणि हिंदू धर्मासाठी ४० दिवस मरणाला समोर जाऊन अंत्यंत तेजस्वी बलिदान दिले, पण कुर औरग्यांने हत्या करून शंभूराजांचे मस्तक एक हिंदू राजाचे अपमान करण्याकरीता बुरहाणपुर नेले. म्हणून छत्रपती श्री. संभाजी महाराज यांचे एक भव्य स्मारक बुरहाणपुरला निर्माण व्हायला हवे.
जेणेकरून महाराष्ट्र राज्य बाहेर सुध्दा शिवछत्रपतींच्या छाव्याला पराक्रमाची आणि बलिदानाची आठवण पुढील पिढयांना होत राहील, आग्रा प्रमाणे बुरहाणपुरला सुध्दा आपल्या प्रयत्नातून शिवपुत्र शंभुराजेंची सेवा घडावी असे निवेदन केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे यांनी देण्यात आले. त्या वेळी अमरावती जिल्ह्याचे धारकरी निषाद सिंह,धारकरी व गोरक्षक दीपक सुरळके,धारकरी मयूर चव्हाण न्हावी,धारकरी गणेश देवकर सावदा,अमरावती जिल्हा व जळगाव जिल्ह्यातील धारकरी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत