प्राचार्य आदरणीय बापूसाहेब श्री सत्यनारायण शिवलाल वैष्णव यांना सेवानिवृत्ती निमित्त शुभेच्छा
प्राचार्य आदरणीय बापूसाहेब श्री सत्यनारायण शिवलाल वैष्णव यांना सेवानिवृत्ती निमित्त शुभेच्छा
दि एज्युकेशन सोसायटी थोरगव्हान ( स्थापना १९१७ )संचालित डी एस देशमुख माध्य व उच्च माध्य हायस्कुल थोरगव्हान चे प्राचार्य आदरणीय बापूसाहेब श्री सत्यनारायण शिवलाल वैष्णव ज्यांना सतीश बैरागी या नावानेही त्यांचे असंख्य चाहते ओळखतात मे अखेर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत श्री एस एस वैष्णवसर हे गेल्या ३४ वर्षांपासून थोरगव्हान येथे कार्यरत होते त्यांनी शिक्षक २८ वर्षे ,पर्यवेक्षक १ वर्ष व मुख्याध्यापक पदी ७ वर्षे कार्य केले ते वरडी ता चोपडा येथील रहिवासी असून कै प्रा आर एस वैष्णव , प्रताप कॉलेज अमळनेर यांचे लहान बंधू आहेत सरांनी ३४ वर्षात तन ,मन व धन वापरून थोरगव्हान पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना सेवा दिली त्यांचा एक कुशल प्रशासक , उपक्रमशील शिक्षक म्हणून वेगळा ठसा उमटलेला होता ,सामाजिक ,शैक्षणिक , धार्मिक क्षेत्रातील विविध संघटनांच्या माध्यमातून भरीव कार्य केले वैष्णवसर शिक्षकांच्या आग्रहास्तव रावेर तालुका माध्यमिक शिक्षक कर्मचारी पतपेढी या पतसंस्थेचे बिनविरोध संचालक व सचिव पदी कार्य केले निसर्ग व पर्यावरण मंडल महाराष्ट्रराज्य यांच्या भूतान अभ्यास दौऱ्यात सहभाग घेतला वैष्णव सरांनी CCRT दिल्ली चे प्रशिक्षण , १२ वी व १० वी बोर्ड भरारी पथक ,अविरत चे प्रशिक्षकपदी उल्लेखनीय कार्य करून प्रशासकीय अधिकाऱ्यांची मने जिंकली होती त्यांनी विविध विषयांचे तालुका ,जिल्हा व विभागीय पातळीवर तज्ञ मार्गदर्शक पदी कार्य केले त्यांची एक स्पष्टवक्ता ,प्रामाणिक ,निस्वार्थी ,तत्पर ,निर्भीड, शाळा व विद्यार्थी यांच्याबाबत आस्था व तळमळ असणारा मुख्याध्यापक ओळख निर्माण झाली त्यांना माजी चेअरमन कै गंगाधरराव देशमुख ,श्री चंद्रकांत दादा देशमुख ( यावल ) ,रावेर तालुक्याचे माजी आमदार व माजी चेअरमन कै आर आर पाटील व विद्यमान चेअरमन श्री चंद्रकांत जनार्दन चौधरी व उपाध्यक्ष श्री उमाकांत बाउस्कर ,सचिव श्री पवनभाऊ चौधरी सर्व संचालक मंडळ , पंचक्रोशीतील जाणकार नागरिक व पालक ,शिक्षण विभागातील सर्वच अधिकारी ,विविध संघटनांचे नियमांची माहिती असणारे पदाधिकारी ,माजी विद्यार्थी ,शिक्षक आमदार ,पदवीधर आमदार ,स्थानिक आमदार व खासदार यांचे वेळोवेळी अनमोल मार्गदर्शन व सहकार्य लाभले श्री वैष्णव सरांना उल्लेखनीय कार्यामुळे तालुका व जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक म्हणून गौरविण्यात आले आहे शेती क्षेत्रात विविध पिकांबाबत नवीन प्रयोग करीत असल्यामुळे वैष्णव सर वरडी गावातील एक प्रयोगशील शेतकरी आहेत वैष्णव सरांचा दोन उच्च शिक्षित मुली ,नातू पत्नी असा परिवार हल्ली मुक्काम वाघोदा खुर्द येथे आहे. सरांना सेवा निवृत्तीचे आयुष्य सुखाचे ,समाधानाचे भरभराटीचे जावो ही सर्व हित चिंतकाची शुभेच्छा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत