Header Ads

Header ADS

गरिब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी संधी : "WINGYAAN" अंतर्गत मोफत डिप्लोमा इन अ‍ॅडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंग एक्सलन्स प्रशिक्षण


Opportunity for poor and needy students - Free Diploma in Advanced Manufacturing Excellence Training under WINGYAAN


गरिब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी संधी : "WINGYAAN"  अंतर्गत मोफत डिप्लोमा इन अ‍ॅडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंग एक्सलन्स प्रशिक्षण


लेवाजगत न्यूज जळगांव-फियाट इंडिया ऑटोमोबाईल्स प्रा. लि. (FIAPL) आणि सिम्बायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी (SSPU), पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने "WINGYAAN" हा अत्यंत महत्त्वाचा CSR उपक्रम राबविण्यात येत आहे. हा कार्यक्रम जळगाव जिल्ह्यातील आर्थिकदृष्ट्या मागास (BPL) मुलींसाठी उच्च शिक्षण आणि रोजगारक्षमता वाढवण्यासाठी एक सुवर्णसंधी ठरणार आहे.


Opportunity for poor and needy students - Free Diploma in Advanced Manufacturing Excellence Training under WINGYAAN


                 WINGYAAN बॅच-V: "डिप्लोमा इन अॅडव्हान्स्ड मॅन्युफॅक्चरिंग एक्सलन्स"  हा तीन वर्षांचा पूर्णवेळ डिप्लोमा कोर्स आहे. ज्यात 22 महिन्यांचे शैक्षणिक प्रशिक्षण आणि 14 महिन्यांचे ऑन-द-जॉब प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यात यशस्वी विद्यार्थिनींना नामांकित कंपन्यांमध्ये सुमारे 20,000/- प्रति महिना पगारासह नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहे. 


                   कोर्स फी, निवास, जेवण, गणवेश आणि वैद्यकीय विमा FIAPL द्वारे प्रायोजित करण्यात येणार आहे. याकरिता उमेदवार किमान 10वी उत्तीर्ण व तिचे वय 16 ते 19 वर्षे (10 जून 2025 पर्यंत) पुर्ण असावे. विद्यार्थिनी दारिद्रयरेषेखालील BPL पिवळे रेशन कार्ड धारक असावी. 


                    या डिप्लोमा कोर्स करिता  अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जून 2025 आहे. अर्ज करण्याकरिता अर्जाची हार्ड कॉपी CSR विभाग, फियाट इंडिया ऑटोमोबाईल्स प्रा. लि., B-19, M.I.D.C. रांजणगांव, ता. शिरूर, जि. पुणे - 412220 व सॉफ्ट कॉपी ईमेल amol.fatale@fiapl.com यावर पाठवावी. तसेच  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर https://jalgaon.gov.in/ जाऊनही अर्ज नोंदवू शकतात 


                    अधिक माहितीसाठी अमोल फटाले: +91 9673330468, amol.fatale@fiapl.com, व शुभम बडगुजरः +91 9975103001, Shubham.Badgujar@fiapl.com यांना संपर्क करावा. जळगाव जिल्ह्यातील जास्तीत जास्त मुलींनी या योजनेचा फायदा घ्यावा असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता केंद्राचे सहाय्यक आयुक्त संदीप गायकवाड यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.