संजय गांधी व इंदिरा गांधी योजनेचे ई-केवायसी शिबिर सावद्यात आयोजित लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा
संजय गांधी व इंदिरा गांधी योजनेचे ई-केवायसी शिबिर सावद्यात आयोजित लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा
लेवाजगत न्यूज सावदा- जळगाव जिल्ह्यात रावेर तालुक्यातील सावदा येथे महाराष्ट्र शासनाच्या संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी विधवा योजना आणि श्रवणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ई-केवायसी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर दिनांक २२ मे २०२५, गुरुवार रोजी सकाळी ८ ते दुपारी २ या वेळेत सावदा येथील श्री.आ.गं.हायस्कूल, पोलीस स्टेशनसमोर आयोजित करण्यात आले आहे.
शिबिरात सहभागी गावे: सावदा, थोरगव्हाण,मांगी, चुनवाडे, उदळी खुर्द, तुमखेडा, उदकी बुद्रुक, तासखेडा, रणगाव, रायपूर आणि गहुखेडा या गावांतील सर्व ग्रामस्थांना या शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शिबिराची उद्दिष्टे: या शिबिरात लाभार्थ्यांना आधार कार्ड, बँक पासबुक आणि आधारशी लिंक असलेला मोबाइल क्रमांक घेऊन उपस्थित राहावे लागेल. ई-केवायसी (आधार व्हेरिफिकेशन) प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ही कागदपत्रे आवश्यक आहेत. या प्रक्रियेमुळे लाभार्थ्यांना योजनांचा लाभ सुरळीतपणे मिळण्यास मदत होईल.
महसूल मंडळ सावदा यांनी सर्व लाभार्थ्यांना विनंती केली आहे की, ते निर्धारित वेळेत शिबिरात उपस्थित राहून आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत