दोन रिक्षांच्या धडकेत सावदा येथिल तरुणीचा मृत्यू
दोन रिक्षांच्या धडकेत सावदा येथिल तरुणीचा मृत्यू
लेवाजगत न्यूज सावदा:- भुसावळ-फैजपूर मार्गावर आज रविवारी रोजी आमोदा-फैजपूर दरम्यान एक ते दीड वाजेच्या सुमारास दोन अँपे रिक्षांची समोरासमोर जोरदार धडक होऊन मोठा अपघात झाला. या दुर्घटनेत सावदा येथिल तरुणीचा मृत्यू झाला असून काही प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
प्राप्त माहितीनुसार, सीटर प्रवासी रिक्षा आमोदा येथून फैजपूरकडे येत होती, तर मालवाहू रिक्षा फैजपूरकडून आमोदा दिशेने जात होती. दोन्ही रिक्षांची समोरासमोर जोरदार धडक झाली. प्रवासी रिक्षा (क्रमांक एम एच १९ सी डब्लू ३५९०)आणि मालवाहू रिक्षा (क्रमांक एम एच १९-७०६४ यामध्ये हा अपघात झाला.
या अपघातात सावदा येथील प्रसिद्ध दंतचिकित्सक माऊली हॉस्पिटल चे संचालक ओम कॉलोनी येथील रहिवाशी डॉ. सोपान खडसे यांची कन्या अदिती सोपान खडसे (वय १४) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अपघातग्रस्त इतर प्रवाशांना गंभीर दुखापती झाल्या असून त्यांना तातडीने फैजपूर पोलिसांनी रुग्णवाहिकेद्वारे स्थानिक रुग्णालयात हलवले आहे. घटनास्थळी फैजपूर पोलीस दाखल झाले असून अपघाताच्या कारणाचा शोध घेतला जात आहे. याप्रकरणी पुढील तपास फैजपूर पोलीस करीत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत