स्वच्छ ऊर्जा उपायांसाठी, प्रगत अणुऊर्जा तंत्रज्ञानात भविष्य घडवण्यासाठी आयसीटी करणार भारताचे नेतृत्व आयसीटी मुंबई द्वारे ‘ऊर्जा विज्ञान व तंत्रज्ञान केंद्र’ स्थापन
आयसीटी मुंबई द्वारे ‘ऊर्जा विज्ञान व तंत्रज्ञान केंद्र’ स्थापन
स्वच्छ ऊर्जा उपायांसाठी, प्रगत अणुऊर्जा तंत्रज्ञानात भविष्य घडवण्यासाठी आयसीटी करणार भारताचे नेतृत्व
लेवाजगत न्यूज उरण(सुनिल ठाकूर) : माननीय अर्थमंत्र्यांनी अलीकडील अर्थसंकल्पात २०४७ पर्यंत १०० गिगावॅट अणुऊर्जा निर्मितीचे महत्वकांशी उद्दिष्ट जाहीर केले असून संशोधन व विकासासाठी तत्काळ २०,००० रुपये कोटींची तरतूद करण्यात आली आहे. राष्ट्रीय अणुऊर्जा अभियानाशी सुसंगत अशा, रसायन तंत्रज्ञान संस्था (ICT), मुंबईने ‘ऊर्जा विज्ञान व तंत्रज्ञान केंद्र’ सुरू करण्याची घोषणा केली आहे. भारताला जागतिक अणुऊर्जा क्रांतीत अग्रस्थानी नेण्याच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आला आहे. संशोधन, नवोन्मेष व औद्योगिक सहकार्य यामधील ऐतिहासिक पार्श्वभूमी लक्षात घेता, हे केंद्र प्रगत अणुऊर्जा प्रणाली व कौशल्य विकासाचे राष्ट्रीय केंद्र म्हणून कार्य करेल.
या उपक्रमाची घोषणा ६ मे २०२५ रोजी मुंबईतील आयसीटीच्या के.व्ही.ऑडिटोरियम मध्ये झालेल्या ‘अणुऊर्जा विज्ञान आणि तंत्रज्ञानातील उद्योग आणि शैक्षणिक संस्थांमधील सहकार्य’ या कार्यक्रमात करण्यात आली. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या डॉ.अनिल काकोडकर (होमी भाभा नॅशनल इन्स्टिट्यूटचे कुलपती आणि अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष) यांनी उपस्थित मान्यवरांना मार्गदर्शन केले.
डॉ.अनिल काकोडकर, कुलपती, होमी भाभा नॅशनल इन्स्टिट्यूट, माजी अध्यक्ष अणुऊर्जा आयोग,"स्वतंत्र आणि नवकल्पनांनी भरलेले विचार देणारे शैक्षणिक क्षेत्र देशाच्या आणि जगाच्या भविष्यास घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. सरकार दीर्घकालीन धोरणं ठरवताना याच क्षेत्राकडून मार्गदर्शन घेतं. एखाद्या देशाची प्रगती संशोधन आणि विकासावरच अवलंबून असते. अणुऊर्जा हे भारताच्या ऊर्जा सुरक्षेसाठी आणि शाश्वत विकासासाठी खूप महत्त्वाचं क्षेत्र आहे. या क्षेत्रात संशोधन वाढवण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल मी रसायन तंत्रज्ञान संस्थेचं (ICT) अभिनंदन करतो," असे म्हणाले.
वैज्ञानिक यश व सामाजिक प्रभाव यांची परंपरा लाभलेल्या आयसीटी ने भारताच्या ऊर्जा क्षेत्राच्या पुनर्रचनेसाठी पावले उचलली आहेत. हे केंद्र पुढील पिढीच्या अणुऊर्जा तंत्रज्ञानांवर लक्ष केंद्रित करेल - जसे की लघु मॉड्यूल रिएक्टर (SMRs), सूक्ष्म मॉड्युलर रिऍक्टर्स (MMRs), हायड्रोजन निर्मिती आणि ॲक्सेलरेटर तंत्रज्ञान - जे भारताच्या स्वच्छ ऊर्जा संक्रमणासाठी अत्यावश्यक ठरतील.
प्रा.जे.बी.जोशी, कुलपती, आयसीटी यांनी सांगितले,“भारताच्या ऊर्जा सुरक्षेसाठी धाडसी नवोन्मेष व ठोस कृती आवश्यक आहे. आयसीटीचे ऊर्जा विज्ञान व तंत्रज्ञान केंद्र संशोधन, कौशल्य व तंत्रज्ञानाचा मुख्य स्तंभ ठरेल, जो आत्मनिर्भरता व शाश्वततेच्या राष्ट्रीय दृष्टिकोनाशी सुसंगत असेल."
आयसीटी केंद्राची असलेली मुख्य वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे :
● १०० MWe (मेगावाट विद्युत) क्षमतेच्या PWR (प्रेशर जल अणुभट्टी) आधारित लघु मॉड्युलर रिऍक्टर आणि ५ MWe क्षमतेच्या मोल्टन सॉल्ट आधारित सूक्ष्म मॉड्युलर रिऍक्टरसारख्या सुरक्षित, प्रगत रिऍक्टर्सचा विकास.
● एमटेक,पीएचडी व पोस्ट-डॉक्टोरल अभ्यासक्रमांसाठी अणुऊर्जा क्षेत्रातील नव्या वैज्ञानिकांची ट्रेनिंग.
(काकोडकर व शर्मा शिष्यवृत्तीसह)
● स्टार्टअप इन्क्युबेशन (स्टार्टअप पोषण केंद्र), धोरण सल्ला व आंतरराष्ट्रीय सहकार्याचे राष्ट्रीय केंद्र म्हणून कार्य.
● प्रत्यक्ष अनुभव आधारित शिक्षणासाठी ॲक्सेलरेटर सुविधा, सिम्युलेटरसह अत्याधुनिक प्रयोगशाळांची उभारणी.
● दरवर्षी १०० हून अधिक प्रमाणित अणुउर्जा तज्ज्ञ तयार करणारा व्यावसायिक प्रशिक्षण कार्यक्रम.
हा उपक्रम भारताच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावेल आणि आयसीटी राष्ट्रीय संस्थेचा मान टिकून ठेवेल. हे केंद्र देशाच्या अणुऊर्जा क्षेत्रात अमुलाग्र बदल घडवेल तसेच स्वच्छ, विश्वासार्ह व सुरक्षित ऊर्जेसाठी समर्पित वैज्ञानिक, तंत्रज्ञ व धोरण तज्ज्ञांची पिढी घडवेल.आयसीटी मुंबई द्वारे ‘ऊर्जा विज्ञान व तंत्रज्ञान केंद्र’ स्थापन
स्वच्छ ऊर्जा उपायांसाठी, प्रगत अणुऊर्जा तंत्रज्ञानात भविष्य घडवण्यासाठी आयसीटी करणार भारताचे नेतृत्व
मुंबई, ७ मे २०२५ : माननीय अर्थमंत्र्यांनी अलीकडील अर्थसंकल्पात २०४७ पर्यंत १०० गिगावॅट अणुऊर्जा निर्मितीचे महत्वकांशी उद्दिष्ट जाहीर केले असून संशोधन व विकासासाठी तत्काळ २०,००० रुपये कोटींची तरतूद करण्यात आली आहे. राष्ट्रीय अणुऊर्जा अभियानाशी सुसंगत अशा, रसायन तंत्रज्ञान संस्था (ICT), मुंबईने ‘ऊर्जा विज्ञान व तंत्रज्ञान केंद्र’ सुरू करण्याची घोषणा केली आहे. भारताला जागतिक अणुऊर्जा क्रांतीत अग्रस्थानी नेण्याच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आला आहे. संशोधन, नवोन्मेष व औद्योगिक सहकार्य यामधील ऐतिहासिक पार्श्वभूमी लक्षात घेता, हे केंद्र प्रगत अणुऊर्जा प्रणाली व कौशल्य विकासाचे राष्ट्रीय केंद्र म्हणून कार्य करेल.
या उपक्रमाची घोषणा ६ मे २०२५ रोजी मुंबईतील आयसीटीच्या के.व्ही.ऑडिटोरियम मध्ये झालेल्या ‘अणुऊर्जा विज्ञान आणि तंत्रज्ञानातील उद्योग आणि शैक्षणिक संस्थांमधील सहकार्य’ या कार्यक्रमात करण्यात आली. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या डॉ.अनिल काकोडकर (होमी भाभा नॅशनल इन्स्टिट्यूटचे कुलपती आणि अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष) यांनी उपस्थित मान्यवरांना मार्गदर्शन केले.
डॉ.अनिल काकोडकर, कुलपती, होमी भाभा नॅशनल इन्स्टिट्यूट, माजी अध्यक्ष अणुऊर्जा आयोग,"स्वतंत्र आणि नवकल्पनांनी भरलेले विचार देणारे शैक्षणिक क्षेत्र देशाच्या आणि जगाच्या भविष्यास घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. सरकार दीर्घकालीन धोरणं ठरवताना याच क्षेत्राकडून मार्गदर्शन घेतं. एखाद्या देशाची प्रगती संशोधन आणि विकासावरच अवलंबून असते. अणुऊर्जा हे भारताच्या ऊर्जा सुरक्षेसाठी आणि शाश्वत विकासासाठी खूप महत्त्वाचं क्षेत्र आहे. या क्षेत्रात संशोधन वाढवण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल मी रसायन तंत्रज्ञान संस्थेचं (ICT) अभिनंदन करतो," असे म्हणाले.
वैज्ञानिक यश व सामाजिक प्रभाव यांची परंपरा लाभलेल्या आयसीटी ने भारताच्या ऊर्जा क्षेत्राच्या पुनर्रचनेसाठी पावले उचलली आहेत. हे केंद्र पुढील पिढीच्या अणुऊर्जा तंत्रज्ञानांवर लक्ष केंद्रित करेल - जसे की लघु मॉड्यूल रिएक्टर (SMRs), सूक्ष्म मॉड्युलर रिऍक्टर्स (MMRs), हायड्रोजन निर्मिती आणि ॲक्सेलरेटर तंत्रज्ञान - जे भारताच्या स्वच्छ ऊर्जा संक्रमणासाठी अत्यावश्यक ठरतील.
प्रा.जे.बी.जोशी, कुलपती, आयसीटी यांनी सांगितले,“भारताच्या ऊर्जा सुरक्षेसाठी धाडसी नवोन्मेष व ठोस कृती आवश्यक आहे. आयसीटीचे ऊर्जा विज्ञान व तंत्रज्ञान केंद्र संशोधन, कौशल्य व तंत्रज्ञानाचा मुख्य स्तंभ ठरेल, जो आत्मनिर्भरता व शाश्वततेच्या राष्ट्रीय दृष्टिकोनाशी सुसंगत असेल."
आयसीटी केंद्राची असलेली मुख्य वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे :
१०० MWe (मेगावाट विद्युत) क्षमतेच्या PWR (प्रेशर जल अणुभट्टी) आधारित लघु मॉड्युलर रिऍक्टर आणि ५ MWe क्षमतेच्या मोल्टन सॉल्ट आधारित सूक्ष्म मॉड्युलर रिऍक्टरसारख्या सुरक्षित, प्रगत रिऍक्टर्सचा विकास.
एमटेक,पीएचडी व पोस्ट-डॉक्टोरल अभ्यासक्रमांसाठी अणुऊर्जा क्षेत्रातील नव्या वैज्ञानिकांची ट्रेनिंग.
(काकोडकर व शर्मा शिष्यवृत्तीसह)
स्टार्टअप इन्क्युबेशन (स्टार्टअप पोषण केंद्र), धोरण सल्ला व आंतरराष्ट्रीय सहकार्याचे राष्ट्रीय केंद्र म्हणून कार्य.
प्रत्यक्ष अनुभव आधारित शिक्षणासाठी ॲक्सेलरेटर सुविधा, सिम्युलेटरसह अत्याधुनिक प्रयोगशाळांची उभारणी.
दरवर्षी १०० हून अधिक प्रमाणित अणुउर्जा तज्ज्ञ तयार करणारा व्यावसायिक प्रशिक्षण कार्यक्रम.
हा उपक्रम भारताच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावेल आणि आयसीटी राष्ट्रीय संस्थेचा मान टिकून ठेवेल. हे केंद्र देशाच्या अणुऊर्जा क्षेत्रात अमुलाग्र बदल घडवेल तसेच स्वच्छ, विश्वासार्ह व सुरक्षित ऊर्जेसाठी समर्पित वैज्ञानिक, तंत्रज्ञ व धोरण तज्ज्ञांची पिढी घडवेल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत