Contact Banner

सावदा बस स्थानक येथे ग्रामीण फेऱ्या व पास केंद्र बंदमुळे नागरिकांसह विद्यार्थ्यांचे हाल

The situation of citizens and students due to the closure of rural fairs and pass centers at Savda bus stand



 सावदा बस स्थानक येथे ग्रामीण फेऱ्या  व पास केंद्र बंदमुळे नागरिकांसह विद्यार्थ्यांचे हाल

लेवा जगत न्यूज सावदा- येथील सावदा बस स्थानकावरून रावेर परिसरात जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या ग्रामीण बस प्राथमिक व माध्यमिक शाळांना सुट्ट्या लागताच बस फेऱ्या बंद केल्याने महिलांसह नागरिकांचे हाल होत आहे व विनाकारण पैशांचा जास्त भुर्दंड सहन करावा लागत आहे, तसेच या परिसरात धनाजी नाना महाविद्यालय जे टी महाजन इंजीनियरिंग कॉलेज,डिप्लोमा कॉलेज व भुसावळ जळगांव येथील  शैक्षणिक संस्था असून या परिसरातून रावेर पेक्षा जास्त सावदा बस स्थानकावर पासधारक असून सुद्धा आगार प्रमुखांनी येथील पास केंद्र बंद केल्यामुळे प्रवाशांचे व विद्यार्थ्यांचे हाल होत आहे. त्यांना रावेर येथे पास काढण्यासाठी जाण्याचा अतिरिक्त भुर्दंड सोसावा लागत आहे.तरी  रावेर आगार प्रमुखांनी ज्या बंद असलेल्या ग्रामीण बस फेऱ्या आहे त्या त्वरित सुरू कराव्या व सावदा येथे पास केंद्र ही त्वरित सुरू करावे अन्यथा विद्यार्थ्यांसह नागरिक आंदोलन करतील.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.