लहान वाघोदा येथे कामगार दिनानिमित्त कामगाराचे हस्ते झेंडावंदन
लहान वाघोदा येथे कामगार दिनानिमित्त कामगाराचे हस्ते झेंडावंदन
लेवाजगत न्यूज लहान वाघोदा-येथे १ मे महाराष्ट्र दिन म्हणजेच कामगार दिनानिमित्त ग्रामपंचायत कार्यालय येथील झेंडावंदन गावच्या प्रथम महिला लोकनियुक्त सरपंच सौ . दिपाली जितेंद्र चौधरी ( मॅडम ) यांनी न फडकवता *गावातील एका गरीब कुटुंबातील कामगार अनिल एकनाथ कोळी यांच्या हस्ते झेंडावंदन करून एक आदर्श निर्माण केला . सरपंच दिपाली चौधरी मॅडम यांनी त्यांना असलेल्या झेंडावंदनचा मान स्वतः न घेता कामगार दिनाचे निमित्त साधून गावातील एक गरीब कामगार अनिल कोळी या कामगाराला मान देऊन त्यांच्या हस्ते झेंडावंदन करून एक उत्कृष्ट आदर्श समाजात व परिसरात निर्माण करण्याचे काम केले आहे .याआधी सुध्दा म्हणजेच मागच्या वर्षी सुध्दा सरपंच यांनी हा मान कामगाराला दिला असून हे त्यांचे दुसरे वर्षे कामगाराच्या हस्ते झेंडावंदन केल्याने परिसरात सरपंच यांच्या आदर्श कामगिरीचे कौतुक केले जात आहे . तसेच जिल्हा परिषद मराठी शाळेत मुख्याध्यापिका सौ .मिनाक्षी फेगडे यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले .
यावेळीलोकनियुक्त प्रथम महिला लोकनियुक्त सरपंच सौ . दिपाली जितेंद्र चौधरी मॅडम , उपसरपंच सत्तार पटेल , भाजपा रावेर तालुका चिटणीस तथा ग्रा .पं . सदस्य जितेंद्र चौधरी सर, फातमा तडवी , दमयंती शिंदे , वंदना कोलते , पुजा कोलते ग्रामविकास अधिकारी श्रीकांत पाटील , जि . प . शाळेचे मुख्याध्यापिका सौ .मिनाक्षी फेगडे मॅडम , स्वातेश सरोदे सर , सौ . प्रणिता सरोदे मॅडम , ग्रामस्थ गणेश चौधरी , सुभाष पाटील , महम्मद कुलकर्णी , आमीन पटेल , अंगणवाडी सेविका प्रतिभा शिंदे , रेखा बाऊस्कर , मदतनीस भारती झोपे , वैशाली कोळी , आशा वर्कर मनिषा कोळी व मनिषा सोनवणे ग्रामपंचायत कर्मचारी रविंद्र कोळी , वैभव चौधरी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत