Header Ads

Header ADS

शहापुरच्या खर्डी गावातील उपसरपंचला लाच घेताना रंगेहाथ पकडले, लाचलुचपत विभागाची कारवाई

 

Shahapur's Khardi village sub-sarpanchal caught red-handed while taking bribe, action taken by anti-corruption department



शहापुरच्या खर्डी गावातील उपसरपंचला लाच घेताना रंगेहाथ पकडले, लाचलुचपत विभागाची कारवाई

लेवाजगत न्यूज ठाणे : शहापूर तालुक्यातील खर्डी ग्रामपंचायतीचे उपसरपंच मोसिम मुर्तुजा शेख (३७) यांना तीस हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले. उपसरपंच यांनी घरपट्टी नावावर करून देण्यासाठी तीस हजार रुपयांची लाच मागितली असल्याची तक्रार लाचलुचपत विभागाकडे तक्रारदाराने केली होती.


तक्रारदार यांनी खर्डी येथे घर खरेदी केले असून या घराची घरपट्टी नावावर करून देण्यासाठी खर्डी ग्रामपंचायतीचे उपसरपंच मोसिम शेख यांनी त्यांच्याकडे ३० हजार रुपयांची लाच मागितली होती. याप्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. त्या अनुषंगाने सापळा रचून ठाणे लाचलुचपत विभागाने खर्डीचे उपसरपंच मोसिम शेख याला ३० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले असून पुढील कारवाई सुरू आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.