Header Ads

Header ADS

ना.धों.महानोर पुरस्कारासाठी शिफारशी पाठविण्याचे आवाहन शेती-पाणी व्यवस्थापन व साहित्य क्षेत्रातील युवा प्रतिभेचा सन्मान

Call for proposals for the Na-Dhon Mahanor Award, an award for young talent in the fields of agriculture, water management and literature



ना.धों.महानोर पुरस्कारासाठी शिफारशी पाठविण्याचे आवाहन शेती-पाणी व्यवस्थापन व साहित्य क्षेत्रातील युवा प्रतिभेचा सन्मान


लेवाजगत न्यूज मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : शेती-पाणी आणि साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना दिला जाणारा “कविवर्य ना.धों. महानोर साहित्य, शेती-पाणी पुरस्कार” यंदा दुसऱ्या वर्षी प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्काराचे आयोजन यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई आणि भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशन, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात येत आहे. या पुरस्कारांची घोषणा चव्हाण सेंटरचे अध्यक्ष मा. शरद पवार यांनी पूर्वीच केली होती.

Call for proposals for the Na-Dhon Mahanor Award, an award for young talent in the fields of agriculture, water management and literature

Call for proposals for the Na-Dhon Mahanor Award, an award for young talent in the fields of agriculture, water management and literature


सन २०२५ साठी खालील क्षेत्रांतील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या शिफारशी मागविण्यात आल्या आहेत :


१. शेती व पाणी व्यवस्थापन - २ शेतकरी (महिला/पुरुष)



२. मराठी साहित्य - ३ कवी आणि १ कादंबरीकार


पुरस्कारासाठी शिफारस करताना खालील बाबी विचारात घ्याव्यात :


पारंपरिक व आधुनिक शेतीपद्धतींचा समन्वय साधणारे, पर्यावरणपूरक, नाविन्यपूर्ण आणि प्रयोगशील कार्य करणारे शेतकरी या पुरस्कारासाठी पात्र ठरतील.


१ सप्टेंबर २०२५ रोजी वय ४५ वर्षांखालील नव्या पिढीतील शेतकरी, लेखक आणि कवी यांचा विचार करण्यात येईल.


साहित्य क्षेत्रातील पुरस्कार विशिष्ट पुस्तकासाठी नसून लेखक-कवींच्या संपूर्ण साहित्यिक योगदानावर आधारित असेल.


मानवी मूल्यांना अधोरेखित करणारे आणि कोणत्याही प्रकारची विषमता न मानणारे साहित्यलेखन करणाऱ्या कवी-लेखकांच्या शिफारशीच ग्राह्य धरल्या जातील.


शिफारस करताना संबंधित व्यक्तीच्या कार्याचे स्वरूप, वैशिष्ट्ये, तसेच साहित्याचे किंवा शेतीविषयक कार्याचे तपशील स्पष्टपणे नमूद करावेत.


शिफारशी पाठविण्याची अंतिम तारीख : ३० जून २०२५

शिफारशी खालील मार्गांनी पाठवाव्यात :


Google Form लिंक : https://forms.gle/KrzrVBuqirJBnxPA6


ईमेल : admin@chavancentre.org


WhatsApp : +91 8169493161


या पुरस्कारांचे वितरण मा. शरदराव पवार यांच्या हस्ते १७ सप्टेंबर २०२५ रोजी यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे होणाऱ्या कार्यक्रमात करण्यात येणार आहे.


हा पुरस्कार नव्या पिढीतील प्रतिभावान कार्यकर्ते व साहित्यिकांना प्रेरणा देणारा ठरेल, असा विश्वास यशवंतराव चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष मा. सुप्रिया सुळे आणि जैन फाउंडेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी व्यक्त केला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.