सावदा येथे कुंदन हॉटेलसमोर भीषण अपघात मस्कावद येथिल हर्षल नारायण सरोदे यांचा जागीच मृत्यू
सावदा येथे कुंदन हॉटेलसमोर भीषण अपघात मस्कावद येथिल हर्षल नारायण सरोदे यांचा जागीच मृत्यू
लेवाजगत न्यूज सावदा:- रावेर तालुक्यातील सावदा–रावेर रस्त्यावरील कुंदन हॉटेलजवळ आज सकाळी ९:३० वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात हर्षल नारायण सरोदे (वय ४५, रा. मस्कावद सिम, ता. रावेर, जि. जळगाव) यांचा जागीच मृत्यू झाला.
ही घटना त्या वेळी घडली, जेव्हा हर्षल सरोदे आणि त्यांचे मित्र हर्षल बाजीराव पाटील (वय ४३, रा. मस्कावद सिम) हे सावद्याहून आपल्या गावी मोटरसायकलने (MH-19-AD-0185) जात होते. दरम्यान, टाटा ट्रक (PB-65-BB-9182) ने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
ट्रकचालक सतविंदरसिंग अमरजितसिंग (वय ३७, रा. अवानकोट, रुपनगर, जि. रोपड, पंजाब) याने निष्काळजीपणे व भरधाव वेगाने ट्रक चालवून हा अपघात घडवून आणला. या धडकेत हर्षल सरोदे यांचा जागीच मृत्यू झाला, तर फिर्यादी हर्षल पाटील हे किरकोळ जखमी झाले आहेत. दुचाकीचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
घटनेनंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हे. कॉ. उमेश पाटील व विजय पोहेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी रावेर येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला आहे.
या प्रकरणी सावदा पोलीस ठाण्यात ट्रकचालक सतविंदरसिंग अमरजितसिंग याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्रक आणि दुचाकी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत