Header Ads

Header ADS

मोठी बातमी! इंडिगो विमानाचे नागपूरमध्ये इमर्जन्सी लॅण्डिंग; खळबळजनक घटना

 

मोठी बातमी! इंडिगो विमानाचे नागपूरमध्ये इमर्जन्सी लॅण्डिंग; खळबळजनक घटना


लेवाजगत न्युज नागपूर:- कोचीहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगो एअरलाइन्सच्या विमानाचे इमर्जन्सी लॅण्डिंग करण्यात आलंय. अहमदाबादहून लंडनला निघालेल्या एअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात झाला. तेव्हापासून अनेक विमानांचे इमर्जन्सी लॅण्डिंग करण्यात आले. आता इंडिगोच्या विमानाचे देखील इमर्जन्सी लॅण्डिंग करण्यात आल्याने खळबळ उडालीये. या विमानाची नागपूर विमानतळावर इमर्जन्सी लॅण्डिंग करण्यात आलीये. हे विमान कोचीहून दिल्लीला निघाले असताना विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली.

विमानाचे इमर्जन्सी लॅण्डिंग प्रवाश्यांमध्ये भितीचे वातावरण



विमानाचे इमर्जन्सी लॅण्डिंग करून लगेचच प्रवाश्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. यानंतर संपूर्ण विमानाची तपासणी केली जातंय. खरोखरच विमानात बॉम्ब ठेवण्यात आलाय का? याची तसापणी सध्या सुरू आहे. या धमकीकडे जास्त गांर्भीयाने बघण्यासाठीचे महत्वाचे कारण म्हणजे धमकी देणाऱ्याने याच विमानाचा बरोबर नंबर नमून केला होता. ज्यावेळी ही धमकी देण्यात आली, त्यावेळी विमान कोचीहून निघाले होते.



सुरक्षेच्या कारणांमुळे विमानाला नागपूर विमानतळावर उतरवण्यात आले. या विमानात 157 प्रवासी होते. मंगळवारी सकाळी 9.20 ला इंडिगो विमान 6E- 2706 कोची विमानतळावरून निघाले. विमान निघून काही वेळातच विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली. ही धमकी मिळाल्यानंतर पायलटने लगेचच याबद्दलची माहिती नागपूर विमानतळाच्या एटीएसला संपर्क साधला आणि इमर्जन्सी लॅण्डिंगची परवानगी मागितली.



विमानातील 157 प्रवासी सुरक्षित


परवानगी मिळाल्यानंतर लगेचच विमानाचे इमर्जन्सी लॅण्डिंग करण्यात आले. याबद्दल माहिती मिळताच बॉम्बशोधक पथक आणि पोलीस विमानतळावर पोहोचले. सध्या तपास सुरू असल्याचीही माहिती मिळत आहे. मात्र, या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. मागील काही दिवसांपासून सतत अशाप्रकारे धमक्या मिळण्याचे प्रवास वाढल्याचे बघायला मिळत आहे. अहमदाबाद विमान अपघाता 270 लोकांचा जीव गेला.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.