Header Ads

Header ADS

"लव्ह जिहाद" यावल तालुक्यातील तरुणीला बुरखा घालण्यास सक्ती

 

"लव्ह जिहाद" यावल तालुक्यातील तरुणीला बुरखा घालण्यास सक्ती

लेवाजगत न्यूज जळगाव:- जळगाव शहरातील एक धक्कादायक बातमी समोर आले आहे. यावल तालुक्यातील एका तरूणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला बुरखा घालण्यास सक्ती करून जीवेठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. 




स्नॅपचॅटवर चॅटींग करून “माझे प्रपोज स्विकार कर नाही तर मी जीव देईल” अशी धमकी देत देवून यावल तालुक्यातील एका तरूणीचा विनयभंग केला. जबरदस्ती बुरखा घालून देत बुरखा काढला तर जीवेठार मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी ४ जून रोजी सकाळी ११ वाजता समोर आला आहे. याप्रकरणी सायंकाळी ५ वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील एकाला अटक करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, यावल तालुक्यातील एका गावात २२ वर्षीय तरूणी ही आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. चोपडा येथील एका फार्मसी महाविद्यालयात शिकत आहे. दरम्यान फरहान हकीम खाटीक रा. किनगाव ता.यावल हा देखील फार्मसी कॉलेजात शिक्षण घेत असल्याने तरूणी आणि फरहान हे दोघे एकाच बसमधून प्रवास करत होते.

   या १ जानेवारी २०२२ ते ४ जून २०२५ या कालावधीत स्नॅप चॅटवरून ओळख निर्माण झाली. स्नॅप चॅटींगच्या माध्यमातून फरहानने पिडीत तरूणीला “तू माझे प्रपोज स्विकार करत नाही तर मी आत्महत्या करेल” अशी धमकी दिली. दरम्यान बुधवारी ४ जून रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास पिडीत तरूणी ही जळगावातील डी मार्ट येथे खासगी कामासाठी गेली होती.  त्यावेळी फरहान हकीम खाटीक आणि त्यांचा मित्र जमील कुरेशी दोन्ही रा. किनगाव ता. यावल या दोघांनी तिचा पाठलाग केला. त्यानंतर फरहान खाटीक याने पिडीत मुलीला जबरदस्तीने बुरखा घालण्यास सांगितले, “तु बुरखा नाही घातला तर मी आत्महत्या करेल” अशी धमकी दिली. त्यामुळे घाबरून पिडीत तरूणीने बुरखा घातला व दोघांसोबत डीमार्ट मध्ये खरेदी करण्याचे सांगितले. तसेच “बुरखा काढायचा नाही, बुरखा काढलास तर जीवे ठार मारेल” अशी धमकी दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.