Header Ads

Header ADS

संगीतम ट्रॅव्हल्स पलटी झाल्याने अपघात; ५ ते ८ प्रवाशी जखमी

 

Sangeet-Travels-overturns-causing-accident-5-to-8-passengers-injured



संगीतम ट्रॅव्हल्स पलटी झाल्याने अपघात; ५ ते ८ प्रवाशी जखमी

लेवाजगत न्यूज जामनेर- तालुक्यात गारखेडा गावाजवळ पुण्याकडे जाणाऱ्या संगीतम ट्रॅव्हल्सला अपघात झाल्याची घटन रविवारी १ जून रोजी रात्रीच्या सुमारास घडली आहे. या अपघातात ५ ते ८ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. गारखेडा गावाजवळ रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम सुरू असल्याने एकतर्फी वाहतूक सुरू होती आणि याचा अंदाज न आल्याने ट्रॅव्हल्स पलटी झाल्याचे सांगितले जात आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याकडे निघालेली संगीतम ट्रॅव्हल्स (क्रमांक अद्याप अज्ञात) जामनेर तालुक्यातील गारखेडा गावाजवळून जात असताना पलटी झाली. हा अपघात रविवार, १ जून रोजी सायंकाळी झाला असावा. रस्त्यावर सुरू असलेल्या काँक्रिटीकरणाच्या कामामुळे एकतर्फी वाहतूक वळवण्यात आली होती. ट्रॅव्हल्स चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने हे वाहन उलटले, अशी प्राथमिक माहिती प्रत्यक्षदर्शींकडून मिळत आहे.

     बेबाबाई घाडे (७५), साहील घाडे (८ दोन्ही रा.खिरोदा) , ललिता इंगळे (४०), दिशा इंगळे (८, दोन्ही रा.बऱ्हाणपूर), योगेश चौधरी (३४) आणि रणजित राजपूत (३०, दोन्ही रा. भुसावळ)  या जखमींना जामनेर उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. अपघातानंतर तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आले. स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासनाने जखमींना मदत केली. जखमी प्रवाशांना तात्काळ जामनेर येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. काही गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी जळगाव जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आल्याचीही माहिती आहे. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलीस घटनास्थळी पोहोचले असून अपघाताच्या नेमक्या कारणांचा तपास करत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.