पाचोरा येथे शिक्षकाची वर्गातच गळफास घेऊन आत्महत्याःआत्महत्येचे कारण अस्पष्ट,पण विद्यार्थ्यांत घबराट
पाचोरा येथे शिक्षकाची वर्गातच गळफास घेऊन आत्महत्याःआत्महत्येचे कारण अस्पष्ट,पण विद्यार्थ्यांत घबराट
लेवाजगत न्यूज पाचोरा-"एका शिक्षकाने शाळेच्या मधल्या सुट्टीत वर्गातच गळफास लावून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना जळगाव जिल्ह्यातील पाचोऱ्यात घडली आहे. या शिक्षकाने हे टोकाचे पाऊल का उचलले? हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पण वर्गात शिक्षकाचा मृतदेह पाहून विद्यार्थ्यांत भितीचे वातावरण पसरले आहे."
"शिक्षक रवींद्र महाले यांनी आत्महत्या का केली? हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पण ही घटना शाळा सुरू असताना घडल्यामुळे विद्यार्थी वर्गात भितीचे वातावरण पसरले आहे. या घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. पोलिस या घटनेचा सर्वच अंगाने तपास करत आहेत. पण तूर्त मानसिक तणावामुळे रवींद्र महाले यांनी आत्महत्या केली असेल असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे."
"रवींद्र महाले हे पाचोरा तालुक्यातील दहीगाव संत येथील रहिवासी होते. ते पाचोरा येथील सुपडू भादु शाळेत कार्यरत होते. गत काही वर्षांपासून ते पाचोरा शहरातीलच गिरा पंपिंग रोडवर वास्तव्यास होते. महाले हे त्यांच्या बोलक्या स्वभावामुळे व चांगल्या व्यक्तिमत्वामुळे सर्वपरिचित होते. त्यामुळे त्यांच्या मृत्यूमुळे शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये शोक व चिंतेचे वातावरण पसरले आहे."
कोणत्याही टिप्पण्या नाहीत