रावेर येथून लग्न सोहळा आटोपून परत येणाऱ्या दोन तरुणांचा आयशर ट्रक अपघातात मृत्यू
रावेर येथून लग्न सोहळा आटोपून परत येणाऱ्या दोन बाईक स्वार तरुणांचा आयशर ट्रक अपघातात मृत्यू
लेवाजगत न्यूज सावदा- आज सोमवार दुपारी ३ ते ४ वाजेच्या सुमारास बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावर वाघोदा बुद्रुक ते रावेर दरम्यान ट्रक व बाईक अपघातात रावेर येथून लग्न लावून घरी परत येत असलेल्या दोन तरुणांचा मृत झाला तर अपघात ग्रस्त ट्रक पळून जात असता महाराष्ट्र मध्यप्रदेश सीमेवर तपासणी नाक्यावर पकडण्यात यश आले सावदा पोलिसांनी पकडलेला आयशर ट्रक सावदा पोलीस स्टेशनच्या आवारात जमा केला व ट्रक चालकास ताब्यात घेतले.
बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावर मोठा वाघोदा या गावाच्या पुढे पेट्रोल पंपाच्या जवळपास एस वळणाच्या पुढे सावदा येथून केळी भरून जाणारा आयशर ट्रक क्रमांक ट्रक व रावेर येथून लग्न सोहळा आटपून घरी परत येणारे रणगाव तालुका रावेर येथील तरुण बाईक स्वार यांचा अपघात झाला असून या मोटर सायकलवर असलेले नितीन धनराज तायडे ४५ रा. रनगाव तालुका रावेर व नितीन रामलाल कोळी ३५ रा. मोहोद भावासा मध्य प्रदेश यांचा जागीच मृत्यू झाला,अपघात झाल्यानंतर ट्रक पसार होण्याच्या मार्गावर असताना मध्यप्रदेश महाराष्ट्र सीमेवर त्याला पकडण्यात आले व सावदा पोलीस स्टेशन मध्ये ट्रक आणण्यात आला मृतांचे छवविच्छेदन रावेर येथील ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले या अपघाताने रणगांव परिसरावर दुःखाचे सावट पसरले असून दोन तरुणांचा जीव गेल्याने हा परिसर दुःखमय झाला आहे.
या कामी सावदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निलेश बावस्कर व इतर कर्मचारी तपास करीत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत