कर्तव्यनिष्ठेचा गौरव! रावेर आगाराचे वाहतूक नियंत्रक शाम भामरे यांचा सोलापूर विभागीय पातळीवर सत्कार
कर्तव्यनिष्ठेचा गौरव! रावेर आगाराचे वाहतूक नियंत्रक शाम भामरे यांचा सोलापूर विभागीय पातळीवर सत्कार
लेवाजगत न्यूज सावदा –सन्मान हा प्रत्येकालाच हवा असतो; पण तो मिळवण्यासाठी आत्मकष्ट, संयम आणि कार्यक्षमता सिद्ध करावी लागते. आपल्या कार्यदक्षतेने हे सिद्ध करून दाखवणारे रावेर आगारातील वाहतूक नियंत्रक शाम भाऊ भामरे यांचा आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर येथे जादा वाहतूक नियंत्रक म्हणून काम पाहताना योग्य नियोजन व उत्कृष्ट व्यवस्थापन यामुळे सोलापूर विभागीय स्तरावर शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
हा सत्कार सोलापूर विभागीय वाहतूक अधिकारी श्री. सौरव देवरे यांच्या हस्ते झाला. या वेळी जादा वाहतूक प्रमुख श्री. संदीप तायडे, जयश लोहार, तसेच श्री. नाईकडा साहेब, बाबु तडवी, मुकेश सौदाणे, अमळनेरचे सावंत व चोपड्याचे सहकारी उपस्थित होते.
शाम भामरे यांनी प्रतिकूल परिस्थितीतही कर्तव्य बजावत आषाढी वारीसारख्या मोठ्या धार्मिक यात्रेचे नियोजन योग्य प्रकारे हाताळले. त्यांच्या या कार्याबद्दल विभागीय पातळीवर गौरव केला गेला, हे रावेर आगारासाठीही अभिमानास्पद आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत