Header Ads

Header ADS

आमोदा येथे आज पुन्हा मोर नदीवर दोन अपघात,ठेकेदार व प्रशासन यांनी काहीतरी उपाययोजना शोधावी

 

Two accidents on the More River in Amoda today, contractor and administration should find some solution


आमोदा येथे आज पुन्हा मोर नदीवर दोन अपघात, ठेकेदार व प्रशासन यांनी काहीतरी उपाययोजना शोधावी

 लेवाजगत न्यूज आमोदा:- तालुका यावल येथील मोर नदी पुलाजवळ आज शुक्रवारी पुन्हा दोन अपघात झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सायंकाळी ३ वाजता झालेल्या जोरदार पावसानंतर हे अपघात घडले. विशेष म्हणजे गेल्या तीन दिवसांतील हे पाचवे अपघात असूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. ठेकेदार व प्रशासनाने यावर काहीतरी उपाययोजना शोधावी अशी मागणी प्रवासी वाहनधारक करीत आहे.




पहिल्या अपघातात, युपी ८३ सी टी ८३१२ क्रमांकाची आयशर गाडी भुसावळहून फैजपूरकडे जात होती. त्याचवेळी एमएच १९ सीवाय ४०५४ क्रमांकाचा छोटा मालवाहू टेम्पो फैजपूरहून भुसावळकडे निघाला होता. दोघेही मोर नदी पुलाजवळ समोरासमोर येऊन धडकले. या धडकेत किरकोळ जखमी झाले असून सुदैवाने जीवितहानी झाली नाही.

Two accidents on the More River in Amoda today, contractor and administration should find some solution


आयशरचा चालक म्हणाला, “मी गाडीचे ब्रेक १५-२० फूट आधीपासून लावत होतो, पण ब्रेक व हँडल फसल्याने टेम्पोला धडक दिली. अन्यथा गाडी थेट नदीत गेली असती.” टेम्पोचे समोरील भागाचे मोठे नुकसान झाले आहे.

या अपघातानंतर आयशर गाडी रस्त्यावर आडवी झाल्याने जवळपास अर्धा तास वाहतूक ठप्प झाली होती. परिणामी फैजपूरकडून येणारी वाहतूक विरोदा-अमोदा मार्गे वळवण्यात आली. त्यामुळे वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागला.


Two accidents on the More River in Amoda today, contractor and administration should find some solution


दुसऱ्या अपघातात, फैजपूरहून भुसावळकडे निघालेली जेके ०२ डीडी ०२९७ क्रमांकाची ट्रक ब्रेक न लागल्याने थेट डाव्या बाजूला जाऊन मातीत रुतली. सुदैवाने यात कोणतीही जखमी किंवा हानी झाली नाही.

गेल्या तीन दिवसांपासून पावसामुळे रस्ते निसरडे झाले असून, सातत्याने होणाऱ्या अपघातांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे झाले आहे. आज पर्यंत या रस्त्यावर २६ ते २७अपघात झाले आहे.


 लेवा जगत न्यूज, सावदा- जाहिरात व बातमीसाठी संपर्क साधा -संपादक श्याम पाटील-8983689844

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.