सावदा येथे धर्मजागृती सभेत उत्सवांमध्ये राबविण्यासाठी मार्गदर्शक सूचना
सावदा येथे धर्मजागृती सभेत उत्सवांमध्ये राबविण्यासाठी मार्गदर्शक सूचना
लेवाजगत न्यूज सावदा, ता. रावेर (प्रतिनिधी) –दिनांक ११ ऑगस्ट २०२५ रोजी सावदा येथे आयोजित धर्मजागृती सभेत सार्वजनिक गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव यांमध्ये करता येऊ शकणाऱ्या उपयुक्त उपक्रमांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
सभेत उपस्थित मान्यवरांनी विशेषतः मातृशक्तीचा सहभाग वाढविण्यावर भर देत, संरक्षणात्मक व विश्वासार्ह वातावरण निर्मितीची आवश्यकता अधोरेखित केली.
सूचनांमध्ये गणपती अथर्वशीर्षाचे ११, २१ किंवा १०८ वेळा सामूहिक पठण, प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन (व्याख्यान, किर्तन, धर्मजागृती सभा) यांचा समावेश होता. मिरवणुकांमध्ये डीजे, बँड वापरताना अश्लील, चित्रपटातील गाणी न वाजवता केवळ देवभक्ती, धर्महित व राष्ट्रहिताची गाणी वाजवावीत, असा ठाम सल्ला देण्यात आला.
मंडळाच्या अतिरिक्त निधीचा वापर फटाके, गुलाल यावर न करता धर्मरक्षणासाठी – जसे की गोसेवा, गरीब बांधवांचे शिक्षण व आरोग्य सुविधा – याकरिता करावा, अशी सूचना देण्यात आली. सजावटीत धर्मजागृतीसाठी फलक व बॅनर लावण्याची, वकृत्व स्पर्धांचे आयोजन करण्याची, तसेच विशेषतः मातृशक्तीसाठी सकाळ-संध्याकाळ लाठी-काठी स्वसंरक्षण प्रशिक्षण वर्ग घेण्याची शिफारस करण्यात आली.
शेवटी, सर्वात महत्त्वाची बाब म्हणून गणपती व देवीची आरती लाऊडस्पीकरवर न लावता, उपस्थितांनी स्वतःच्या मुखाने भक्तिभावाने म्हणावी, यामुळे आपल्या श्रद्धा व आस्थेमध्ये सकारात्मक बदल होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत