Contact Banner

अल्पवयीन मुलीवर अत्याचार; खोटे सांगून शाळेतून नेणाऱ्या आरोपीवर गुन्हा दाखल



Minor girl raped in Bhusawal; case registered against accused who took her from school by lying


 अल्पवयीन मुलीवर अत्याचार; खोटे सांगून शाळेतून नेणाऱ्या आरोपीवर गुन्हा दाखल

प्रतिनिधी भुसावळ – शहरातील एका शाळेत शिकणाऱ्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला खोटे सांगून शाळेतून घेऊन जाऊन तिच्यावर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी तौसीफ जहाबाद तडवी (रा. पाल, ता. रावेर) याच्याविरोधात भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी रावेर तालुक्यातील एका गावातील रहिवासी असून ती भुसावळ येथील शाळेत शिक्षण घेत होती. दिनांक ७ ऑगस्ट रोजी संशयित आरोपी तडवी शाळेत येऊन मुख्याध्यापकांना लेखी अर्ज देत मुलीचा भाऊ असल्याचे खोटे सांगितले. मुख्याध्यापकांची दिशाभूल करून त्याने मुलीला सोबत घेतले व मुंबई, चोपडा आणि जळगाव येथे नेले.

९ ऑगस्ट रोजी जळगाव शहरातील एका हॉटेलमध्ये आरोपीने तिच्यावर अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद आहे. घटनेनंतर पीडितेच्या वडिलांनी तात्काळ भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेतली. तक्रारीवरून १२ ऑगस्ट रोजी रात्री १० वाजता आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, शाळकरी मुला-मुलींच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. पालकांमध्येही चिंतेचे वातावरण आहे. प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश देशमुख करत असून, आरोपीला लवकरात लवकर अटक करून न्याय मिळावा, अशी मागणी होत आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.