न्यू स्टेट बँक कॉलनीतील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; दाम्पत्यासह पाच जण ताब्यात
न्यू स्टेट बँक कॉलनीतील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; दाम्पत्यासह पाच जण ताब्यात
लेवाजगत न्यूज जळगाव-जळगाव शहरातील न्यू स्टेट बँक कॉलनी येथील भाड्याच्या घरात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर रामानंदनगर पोलिसांच्या पथकाने रविवारी (१० ऑगस्ट) सायंकाळी ७ वाजता छापा टाकून दाम्पत्यासह पाच जणांना ताब्यात घेतले. यामध्ये पश्चिम बंगाल येथील एका महिलेची सुटका करण्यात आली आहे.
ताब्यात घेतलेल्यांमध्ये घरमालक दिनेश संजय चौधरी (३५, रा. राधाकृष्ण नगर, दूध फेडरेशन) आणि त्याची पत्नी यमुना राकेश प्रजापती उर्फ भारती दिनेश चौधरी (४२, रा. देवेंद्र नगर, ह.मु. न्यू स्टेट बँक कॉलनी) यांचा समावेश आहे. यांच्यासह तीन तरुणांना देखील अटक करण्यात आली असून, रात्री ११ वाजता रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
गोपनीय माहितीवर कारवाई
पोलिस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिस उपनिरीक्षक सचिन रणशेवरे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने डमी ग्राहक पाठवून कारवाई केली. खात्री पटताच पथकाने सापळा रचून दोन मजली इमारतीवर छापा टाकला.
आमिष दाखवून देहविक्रीचा व्यवसाय
तपासात उघड झाले की, हे दाम्पत्य पश्चिम बंगाल येथील तरुणीला जास्त पैशांचे आमिष दाखवून देहविक्री करण्यास भाग पाडत होते. छाप्यात रोख रक्कम व आक्षेपार्ह साहित्य जप्त करण्यात आले.
या प्रकारामुळे भरवस्तीत असलेल्या परिसरातील शांतता भंग पावली होती. याप्रकरणी आरोपी दाम्पत्यावर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत