संतांचे गौरवोद्गार :“लेवा जगत हे सर्वांचे मन ओळखून स्थान देणारे साप्ताहिक” १८ व्या वर्धापन दिनानिमित्त विशेषांकाचे सावदा येथे विमोचन
संतांचे गौरवोद्गार : “लेवा जगत हे सर्वांचे मन ओळखून स्थान देणारे साप्ताहिक”
१८ व्या वर्धापन दिनानिमित्त विशेषांकाचे सावदा येथे विमोचन
लेवा जगत न्यूज सावदा –लेवा समाजासह इतर सर्व समाजाच्या भावना, प्रश्न आणि घडामोडींना न्याय देत मागील दीड दशकाहून अधिक काळ सतत प्रकाशमान राहिलेलं साप्ताहिक लेवा जगत या वृत्तपत्राने आपल्या वाटचालीतील १८ वर्षांचा यशस्वी टप्पा गाठला आहे. यानिमित्ताने खास वर्धापन दिन विशेषांक प्रकाशित करण्यात आला.
या विशेषांकाचे विमोचन आज दिनांक २८ सप्टेंबर, रविवार रोजी सकाळी १० वाजता सावदा येथील श्री स्वामीनारायण मंदिरात संतांच्या शुभहस्ते पार पडले.
यावेळी कोठारी शास्त्री स्वयंप्रकाश दासजी, शास्त्री धर्म किशोर दासजी, शास्त्री विश्व प्रकाश दासजी, शास्त्री भक्तीप्रिय दासजी, भंडारी माधवस्वामी, पुजारी सत्यप्रकाश दासजी यांच्यासह व्हाईस ऑफ मीडियाचे रावेर तालुकाध्यक्ष, आवाज परिवर्तन वृत्तपत्राचे संपादक अनोमदर्शी तायडे, व्हाईस ऑफ मीडियाचे जिल्हाप्रमुख तसेच बनाना परिसरचे संपादक पंकज पाटील, बनाना सिटी वृत्तपत्राचे संपादक कमलाकर पाटील, उदय निर्मलचे संपादक राजेंद्र दिपके, सिद्धांत नायकचे संपादक भारत हिवरे, लाईव्ह ट्रेडचे प्रतिनिधी जितेंद्र कुलकर्णी, दिव्य मराठीचे प्रतिनिधी, खानदेश माझाचे संपादक राजेश चौधरी तसेच हरिभक्त राजू शाह इ.उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक तथा श्री स्वामीनारायण मंदिराचे ट्रस्टी नंदकुमार पाटील यांनी केले.
यावेळी मान्यवर संत व उपस्थितांनी प्रतिपादन केले की,
“साप्ताहिक लेवा जगत हे सर्व समाजाला धरून चालणारे साप्ताहिक आहे. संपादक हे सर्वांचे मन ओळखून सर्वांना आपल्या वृत्तपत्रात स्थान देतात, यामुळेच हे साप्ताहिक आज या उंचीपर्यंत पोहोचले आहे.”
लेवा जगतचे संपादक श्याम पाटील यांनी या प्रसंगी आपल्या प्रवासाची सविस्तर माहिती प्रास्ताविकाच्या स्वरूपात मांडली. त्यांनी उपस्थित संतांचे आशीर्वाद घेतले व पत्रकार बांधवांचे आभार मानले. तसेच ते म्हणाले की,
“श्री स्वामीनारायण भगवान व कुलस्वामिनी मातेचे आशीर्वाद आमच्या पाठीशी असेच राहिले, माझ्या सहकाऱ्यांचे मोलाचे सहाय्य सदैव लाभले आणि जाहिरातदार व वर्गणीदारांचा पाठिंबा कायम राहिला तर लेवा जगतची प्रगती अधिक जोमाने होईल यात शंका नाही. आज प्रेस मीडियासोबतच डिजिटल मीडियामध्येही लेवा जगत आपली भक्कम छाप सोडत असून, आपल्या आशीर्वाद व सहकार्यामुळे आगामी काळात अधिक मोठ्या भरभराटीकडे वाटचाल होईल.”
संपादक मंडळाने या प्रसंगी वाचकांना कळवले की, लेवा जगतच्या नावाने चालविल्या जाणाऱ्या सोशल मीडिया साईट, युट्युब चॅनेल, वेबसाईट, इंस्टाग्राम, फेसबुक पेज व इतर माध्यमांतून दररोज आपल्या भागातील घडामोडी, प्रश्न, लेख व बातम्या प्रसिद्ध होत असतात.
📧 ई-मेल – lewajagat@gmail.com
📞 मोबाईल – 86684 14507

कोणत्याही टिप्पण्या नाहीत