Header Ads

Header ADS

फैजपूर नगरपालिकेत वाघुळदे दाम्पत्याची दमदार एन्ट्री!


 फैजपूर नगरपालिकेत वाघुळदे दाम्पत्याची दमदार एन्ट्री!


 लेवाजगत न्यूज प्रतिनिधी फैजपूर:- 

फैजपूर नगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीला आता राजकीय रंग चढू लागला आहे. विविध दावे, चर्चांना वेग आला असून, या पार्श्वभूमीवर समाजसेवेच्या बळावर फैजपूरकरांच्या मनात आपली वेगळी ओळख निर्माण करणारे श्री. सिद्धेश्वर वाघुळदे आणि त्यांची पत्नी सौ. धनश्री सिद्धेश्वर वाघुळदे हे दाम्पत्य निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास सज्ज झाले आहे.


यावर्षी नगराध्यक्षपद हे सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव असल्याने सौ. धनश्री वाघुळदे नगराध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत, तर सिद्धेश्वर वाघुळदे स्वतः नगरसेवक पदासाठी तयारी करत आहेत.

विकासदृष्टी, पारदर्शक प्रशासन आणि नागरिकांच्या अडचणींना तत्परतेने प्रतिसाद देणे हे त्यांच्या कार्याचं प्रमुख उद्दिष्ट असल्याचं त्यांनी सांगितलं.


“सेवा हाच धर्म, आणि विकास हाच ध्यास” या तत्त्वावर कार्य करणाऱ्या वाघुळदे दाम्पत्याने फैजपूर शहरात अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवले आहेत. त्यांनी सुरू केलेली अँब्युलन्स सेवा, गरजूंसाठी वैद्यकीय मदत, स्वच्छता मोहिमा आणि आरोग्य जनजागृती कार्यक्रम ही त्यांच्या समाजाभिमुख वृत्तीची साक्ष देतात.


सिद्धेश्वर वाघुळदे हे अध्यक्ष – यावल तालुका भाजपा प्रज्ञावंत आघाडी, तसेच संचालक – जिल्हा माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर नोकरांची नागरी पतपेढी, जळगाव, आणि राज्य सचिव – महाराष्ट्र राज्य शैक्षणिक प्रयोगशाळा वर्गवारी महासंघ या पदांवर कार्यरत आहेत.

त्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील कार्यामुळे फैजपूर आणि परिसरात त्यांनी भक्कम जनाधार निर्माण केला आहे.


राजकीय सूत्रांच्या मते, भारतीय जनता पार्टीतर्फे सौ. धनश्री वाघुळदे यांना नगराध्यक्षपदासाठी तिकीट मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्यांच्या उमेदवारीमुळे फैजपूर नगरपालिकेतील राजकीय समीकरणात नवचैतन्य निर्माण झाले असून, आगामी निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.