सावदा नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक
सावदा नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक
लेवाजगत न्यूज प्रतिनिधी सावदा :- मुक्ताईनगर मतदारसंघातील सावदा नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक सोमवारी, दि. २० ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता कोचूर रोडवरील संकल्प सिद्धी गणेश मंदिर येथे पार पडणार आहे.या बैठकीत सावदा नगरपालिकेच्या निवडणुकांसंदर्भात संघटनात्मक बांधणी, प्रचारातील रणनिती, कार्यकर्त्यांची जबाबदारी तसेच पक्षाची एकजूट याबाबत सविस्तर चर्चा होणार आहे.
शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या सावद्यात पुन्हा भगवा फडकवण्यासाठी पक्षश्रेष्ठींच्या मार्गदर्शनाखाली नव्या रणनितीची आखणी करण्यात येणार आहे. आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्याचा उद्देश असून, शहरातील सर्व प्रमुख पदाधिकारी, शाखा प्रमुख आणि कार्यकर्ते या बैठकीस उपस्थित राहणार आहेत.
पक्षाची ताकद अधिक बळकट करून आगामी निवडणुकीत विजयी घोडदौड साधण्यासाठी ही बैठक महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना शहरप्रमुख सुरज परदेशी आणि युवासेना शहरप्रमुख मनीष भंगाळे यांनी सर्व शिवसैनिकांना वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत