Contact Banner

नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणाची सोडत ६ ऑक्टोबरला मंत्रालयात

Reservation for Mayor's post to be released in the Ministry on October 6


नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणाची सोडत ६ ऑक्टोबरला मंत्रालयात

लेवा जगत न्यूज प्रतिनिधी, मुंबई :
राज्यातील नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदासाठी आरक्षण निश्चित करण्याची सोडत येत्या सोमवार, दि. ६ ऑक्टोबर २०२५ रोजी मंत्रालय, मुंबई येथे काढण्यात येणार आहे. मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील परिषद सभागृहात ही सोडत पार पडणार आहे.

राज्यातील एकूण २४७ नगरपरिषदा व १४७ नगरपंचायतींचे नगराध्यक्ष पदे या सोडतीत निश्चित होणार आहेत. नगराध्यक्षपदाचे आरक्षण ठरविण्यासाठी होणाऱ्या या सोडतीकडे सर्व राजकीय पक्ष तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांचे लक्ष लागले आहे.

शासनाच्या उपसचिव प्रियांका कुलकर्णी-छापवाले यांनी यासंदर्भात सर्व राजकीय पक्षांना पत्र पाठविले आहे. सुरक्षिततेच्या कारणास्तव मंत्रालयीन प्रवेश मर्यादित असल्याने प्रत्येक पक्षामार्फत फक्त दोन प्रतिनिधींनाच सोडतीस उपस्थित राहण्याची परवानगी दिली जाणार आहे. यासाठी संबंधित पक्षाचे अध्यक्ष किंवा सचिव यांनी दोन प्रतिनिधींची नावे शिफारस करून पाठवावीत, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

या सोडतीनंतर राज्यभरातील नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष निवडणुकांचे चित्र स्पष्ट होणार असून स्थानिक राजकारणात चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.