देशाच्या राजधानीत भीषण स्फोट — लाल किल्ला परिसर हादरला!
देशाच्या राजधानीत भीषण स्फोट — लाल किल्ला परिसर हादरला!
लेवाजगत न्यूज दिल्ली :–
दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात आज सायंकाळी भीषण स्फोट झाला असून आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. हा स्फोट लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक 1 बाहेरील पार्किंगमध्ये झाला. स्फोटाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
प्राथमिक माहितीनुसार, एका इको व्हॅनमध्ये स्फोट झाला असून त्यानंतर परिसरात मोठी आग लागली. आगीत अनेक वाहने जळून खाक झाली आहेत. स्फोटाचा आवाज इतका मोठा होता की परिसरातील घरे आणि दुकानांच्या काचा फुटल्या.
तपास आणि कारवाई:
पोलिस, अग्निशामक दल, बॉम्ब शोधक व फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. परिसर पूर्णपणे सील करण्यात आला असून डॉग स्क्वॉडच्या मदतीने तपास सुरू आहे.
जखमी आणि नुकसान:
या घटनेत 24 जण जखमी झाले असून त्यांच्यावर एलएनजीपी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनास्थळी गाड्यांचा चक्काचूर झाला असून, काही ठिकाणी मानवी अवयव देखील विखुरलेले असल्याचे दृश्य बघ्यांनी सांगितले आहे.
हाय अलर्ट जारी:
या घटनेनंतर संपूर्ण दिल्लीसह मुंबईतही हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे. पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.
स्फोटाचे नेमके कारण व दहशतवादी हल्ल्याची शक्यता तपासात असून, सुरक्षा यंत्रणांकडून सर्व दृष्टीकोनातून चौकशी सुरू आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत