Contact Banner

निवडणुकांचा धुराळा उडण्याआधीच राज्यातला भाजपचा पहिला नगराध्यक्ष विजयी

dondaicha-varwade-bjp-unopposed-results-2025



दोंडाईचा–वरवाडे नगरपरिषदेवर भाजपची दणदणीत सुरुवात : नगराध्यक्षपदासह सातही उमेदवार बिनविरोध विजयी

लेवाजगत न्यूज धुळे : दोंडाईचा–वरवाडे नगरपरिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने पहिल्याच टप्प्यात मोठा राजकीय विजय मिळवत दणदणीत सुरुवात केली आहे. पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या नेतृत्वाखाली लढवल्या जाणाऱ्या या निवडणुकीत त्यांच्या मातोश्री आणि माजी नगराध्यक्षा नयनकुंवर रावल यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड जाहीर झाली.
विरोधी महाविकास आघाडीच्या शरयु एकनाथ भावसार यांचा अर्ज छाननीदरम्यान बाद झाल्याने हा निकाल निश्चित झाला.

नगराध्यक्षपदाबरोबरच भाजपच्या सर्व ७ नगरसेवक उमेदवारांचीही बिनविरोध निवड झाली असून शहरात पक्ष कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू आहे.
भाजपकडून बिनविरोध विजयी ठरलेले उमेदवार :

  • रविना महेश कुकरेजा
  • सरला छोटू सोनवणे
  • चतूर जिभाऊ पाटील
  • राणी राकेश अग्रवाल
  • वैशाली प्रवीण महाजन
  • निखिलकुमार रविंद्र जाधव
  • भरतरी पुंडलिक ठाकूर

२६ सदस्यीय नगरपरिषदेत भाजपच्या सर्व अर्जांवर कोणतीही हरकत न लागता ते वैध ठरले, तर विरोधी उमेदवारांचे अर्ज तांत्रिक कारणांमुळे बाद झाल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

 शहरातील बदलते समीकरण

अलीकडेच माजी मंत्री डॉ. हेमंत देशमुख आणि माजी नगराध्यक्ष डॉ. रवींद्र देशमुख यांनी पालकमंत्री रावल यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भाजपात प्रवेश केला. त्यामुळे स्थानिक पातळीवर भाजपसमोर प्रभावी विरोधक उरले नसल्याचे मानले जात आहे.
अर्ज छाननीच्या दिवशीच सात प्रभागांत बिनविरोध विजय निश्चित झाल्याने भाजपची निवडणूक रणनीती आणि संघटनशक्ती अधोरेखित झाली आहे, अशी माहिती पालकमंत्री रावल यांचे स्वीय सहाय्यक दिनेश ठाकरे यांनी दिली.

 जिल्ह्यातील इतर ठिकाणी चुरस वाढली

शिरपूर–वरवाडे, शिंदखेडा आणि दोंडाईचा नगरपंचायत क्षेत्रांतही निवडणूक प्रक्रिया वेग घेत असून, अनेक ठिकाणी बहुकोनी लढती निर्माण झाल्या आहेत.
भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे) यांच्या गटबाजी, स्थानिक समीकरणे आणि विकासाचे मुद्दे यामुळे आगामी निकालाबाबत उत्सुकता वाढली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.