मातोश्री फाऊंडेशन पिंपरुड तर्फे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न
मातोश्री फाऊंडेशन पिंपरुड तर्फे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न
लेवाजगत न्यूज पिंपरुड : -मातोश्री फाऊंडेशन पिंपरुड व कांताई नेत्रालय जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार, दि. 27 नोव्हेंबर 2025 रोजी मोफत नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर पिंपरुड येथील गट क्रमांक 439 वर यशस्वीरित्या आयोजित करण्यात आले.
या शिबिरामध्ये एकूण 30 रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली. यापैकी 10 रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात येऊन त्यांना पुढील उपचारासाठी जळगाव येथे नेण्यात आले.
या शिबिरामध्ये नेत्र तपासणीचे कार्य डॉ. जॅकी शेख व त्यांच्या वैद्यकीय टीमने पार पाडले. शिबिर यशस्वी करण्यासाठी मातोश्री फाऊंडेशनचे उपाध्यक्ष चंद्रकांत जंगले व सामाजिक कार्यकर्ते श्री. यशवंत वारके यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
ग्रामीण परिसरातील नागरिकांना दृष्टीदानाच्या माध्यमातून आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचा हा उपक्रम कौतुकास्पद ठरला आहे.
लेवा जगत न्यूज — पिंपरुड

कोणत्याही टिप्पण्या नाहीत