Contact Banner

सावदा नगरपरिषद निवडणूक 2025 – महाजन परिवारातून उच्चशिक्षित उमेदवार रिंगणात


  सावदा नगरपरिषद निवडणूक 2025 – महाजन परिवारातून उच्चशिक्षित उमेदवार रिंगणात

लेवाजगत न्युज सावदा : स्थानिक राजकीय वारसा आणि सामाजिक कार्याची भक्कम परंपरा जपणाऱ्या महाजन परिवारातून आनंद हॉस्पिटलचे संचालक डॉ. श्री भूषण दिलीप महाजन यांनी प्रभाग क्रमांक 7 (ब) सर्वसाधारण विभागातून (भाजपा) तसेच अपक्ष अशा दोनही पद्धतीने नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

उमेदवारी अर्ज दाखल करताना परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. या वेळी ज्येष्ठ समाजसेवक श्री दिलीप प्रल्हाद महाजन, श्री सुभाष प्रल्हाद महाजन, श्री अमित दत्तात्रय महाजन, श्री भूषण वसंत महाजन, श्री स्वप्नील सुभाष महाजन यांसह महाजन परिवारातील मान्यवर उपस्थित होते.


तसेच परिसरातील मित्रपरिवार व समर्थकांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली. त्यामध्ये
किरण भाऊ कुंभार, रघुनाथ कुंभार, रूपेश कुंभार, चंद्रकांत कुंभार, असिफ खाटिक, भीमा कुंभार, विशाल महाजन, सुनील महाजन, एकनाथ महाजन, शेख आबीद, श्री केजरीवाल आदी कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग होता. प्रभागातील महिला वर्गानेही मोठ्या संख्येने हजेरी लावून आपला पाठिंबा दर्शवला.

डॉ. भूषण महाजन यांच्या उमेदवारीमुळे प्रभाग क्रमांक 7 मध्ये निवडणुकीची लढत अधिक रंगतदार होणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.