सावदा पालिका प्रभाग क्र. ५ ब मधून सुहास शालिग्राम भंगाळे यांची अपक्ष उमेदवारी जाहीर
प्रभाग क्र. ५ ब मधून सुहास शालिग्राम भंगाळे यांची अपक्ष उमेदवारी जाहीर
लेवाजगत न्यूज सावदा – येथील प्रसिद्ध उद्योगपती व सर्वांना परिचित असलेले, समाजाच्या सर्व स्तरांमध्ये सक्रिय सहभाग घेणारे सुहास शालिग्राम बंगाळे यांनी आगामी नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक ५ मधून अपक्ष उमेदवारी जाहीर केली आहे.
सुहास भंगाळे हे रेणुका ट्रेडर्सचे संचालक असून, सावदा येथील नामवंत प्रतिष्ठित शालिग्राम भंगाळे (साहेब) यांचे सुपुत्र आहेत.
समाजामध्ये त्यांचे व्यापक संपर्क व कार्यकर्तृत्व असल्याने त्यांच्या उमेदवारीला सर्व स्तरातून मोठा पाठिंबा मिळत आहे.
सामाजिक, शैक्षणिक आणि जनसामान्यांच्या हिताच्या उपक्रमांत त्यांनी सातत्याने सहभाग घेतल्यामुळे ते नागरिकांमध्ये लोकप्रिय आहेत.
त्यांच्या अपक्ष उमेदवारी घोषणेमुळे प्रभाग क्रमांक ५ ब मध्ये निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत